By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 28, 2019 07:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मिलिंद देवरा यांनी आज मावळते अध्यक्ष संजय निरुपम यांच्याकडून अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काही दिवस आधीच संजय निरूपम यांना डच्चू देऊन त्यांच्याजागी माजी खासदार मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संजय निरुपम हे नेहमी वादग्रस्त विधान करण्यासाठी चर्चेत असायचे. त्यांना पक्षातूनही टोकाचा विरोध होता. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर हाय कमांडने त्यांना पदावरून पायउतार केले.
मला चार वर्ष सहकार्य करणार्यांचे आभार तसेच चार वर्ष असहकार्याचे वातावरण निर्माण केले त्यांचेही आभार असे संजय निरुपम म्हणाले. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यावरही भाष्य केले. देवरा हे माझे मित्र आहेत, त्यांच्याशी माझे काही मतभेद नाहीत आणि नव्हते हे त्यांनी स्पष्ट केले. मिलिंद देवरा यांनी देखील अध्यक्ष पदाची सुत्र हाती घेतल्यावर निरुपम यांच्या सोबत मैत्रीचे संबंध असल्याचे म्हटले होते. राहुल आणि सोनिया गांधी यांनी त्यांची नियुक्ती केली आहे, ती सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आपल्याकडे एक महिना आहे, मुंबईतील सहाच्या सहा जागा जिंकण्यासाठी आपण सर्वांनी दिवसरात्र मेहनत केली पाहिजे असे आवाहन निरुपम यांनी केले.
लोकसभा 2019 ची रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मत....
अधिक वाचा