ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रातील निवडणुकीच्या राजकीय तोफा आज थंडावणार

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 27, 2019 01:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 महाराष्ट्रातील निवडणुकीच्या राजकीय तोफा आज थंडावणार

शहर : मुंबई

महाराष्ट्रात निवडणुकीच्या आरोप्रत्यारोपांच्या जोरदार फैऱ्या झाल्यावर आज संध्याकाळी निवडणुकीचा जाहीर प्रचार संपणार आहे. तर, येत्या सोमवारी लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातली १७ मतदारसंघात मतदान होणार आहे. या सर्वच ठिकाणी आज प्रचार संपणार आहे. तर, मतदारांपर्यंत पोहोचण्याची अखेरची संधी असल्याने आज सगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी आपापल्या स्टार प्रचारकांना मैदानात उतरवण्याचा कार्यक्रम आखला आहे. यापैकी मुंबईतली मुख्यमंत्र्यांच्या रोड शो कडे साऱ्यांच्या नजरा असणार आहेत.

तर, प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकत्र सभा घेण्याची संधी हुकवली आहे. शेवटच्या काही तासात पवार-राहुल गांधी एका मंचावर येण्याचा कुठलाही कार्यक्रम झाला नाही. माञ, काल संध्याकाळी राहुल गांधींनी संगमनेरमध्ये जाहीर सभा घेऊन महाराष्ट्रात आपल्या प्रचार सभांचा शेवट केला. तर शरद पवार आज मावळ मतदारसंघात प्रचार करणार आहेत. 

 

मागे

मोदींनी चुकवले शिवाजी महाराजांचे नाव- कॉंग्रेसचा टोला
मोदींनी चुकवले शिवाजी महाराजांचे नाव- कॉंग्रेसचा टोला

मुंबईमध्ये काल राञी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी मोद....

अधिक वाचा

पुढे  

राज ठाकरेंच्या दाव्यांची भाजपाकडून पोलखोल
राज ठाकरेंच्या दाव्यांची भाजपाकडून पोलखोल

राज ठाकरे यांनी 32 वेगवेगळे आरोप केले आहेत. त्यांनी दाखविलेले व्हिडीओ हे भाज....

Read more