ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

साध्वी प्रज्ञा सिंहला पुन्हा निवडणूक आयोगानं पाठवली नोटीस

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 05, 2019 05:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

साध्वी प्रज्ञा सिंहला पुन्हा निवडणूक आयोगानं पाठवली नोटीस

शहर : bhopal

भोपाळ मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने साध्वी यांच्यावर तीन दिवसांसाठी प्रचारबंदीची कारवाई केली होती. ही कारवाई रविवारी संपताच साध्वी यांना निवडणूक आयोगाने पुन्हा एक नोटीस पाठविली आहे. प्रचारबंदी दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मंदिरात जाऊन भजन आणि किर्तनाच्या माध्यमातून प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसने केला. याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. या प्रकरणावर कारवायी करताना निवडणूक आयोगाने आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पुन्हा नोटीस पाठविली आहे. यावर दोन दिवसात स्पष्टीकरण देण्यास निवडणुक आयोगानं साध्वी यांना सांगितले आहे. त्याचप्रमाणे मंदिरातील व्हिडीओ आणि फोटो जमा करण्यास सांगितले आहे.
बाबरी मशीद विध्वंसाबाबत बोलताना साध्वींनी आनंद व्यक्त केला होता. तसेच या कृत्याचा आपल्याला गर्व असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या वादग्रस्त विधानामुळे निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. त्यामुळे याबाबत कारवाई म्हणून त्यांच्यावर 72 तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली. ही बंदी गुरुवार सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहे. या काळात त्या कोणत्याही प्रचार रॅलीत, सभेत सहभागी होऊ शकणार नाहीत. तसेच कोणतीही मुलाखत तसेच प्रतिक्रियाही त्यांना देता येणार नव्हत्या. मात्र, या काळात साध्वी यांनी मंदिरात जाऊन भजव किर्तन करत प्रचार केला. असा आरोप काँग्रेसनं केला आहे.

मागे

कोणत्याही चौकशीला तयार; पण ‘राफेल चाही तपास करा - राहुल गांधी
कोणत्याही चौकशीला तयार; पण ‘राफेल चाही तपास करा - राहुल गांधी

यूपीएच्या काळात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या व्यावसायिक भागीदारा....

अधिक वाचा

पुढे  

सात राज्यांमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू, जम्मू- काश्मीरमध्ये तणाव
सात राज्यांमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू, जम्मू- काश्मीरमध्ये तणाव

लोकसभा निवडणुकीच्या चव्या टप्प्यासाठीच्या मतदानाला सोमवारी सकाळी ७ वाजल्....

Read more