By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 01:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : varanasi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शुक्रवारी एनडीएतील घटकपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अन्य नेत्यांच्या साक्षीनं तसंच शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल यांचे आशीर्वाद घेऊन वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, डीएमके नेते ओ. पन्नीरसेल्वम, एम. थंबीदुराई, भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, नितीन गडकरी आदी उपस्थित होते. मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तसेच, काळ भैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी मोदींनी वाराणसीत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांच्या छपरावर, बाल्कनीतून नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तर, मी वाराणसीतील नागरिकांचे मनापासून आभार मानतो. ५ वर्षांनंतर येथील नागरिकांनी पुन्हा आशीर्वाद दिला आहे. जिथे-जिथे मतदान अजून व्हायचं आहे, तिथं शांततेत मतदान करावं अशी मतदारांना विनंती करतो, असं मोदी यांनी आवाहन केलं आहे.
राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महाराष्ट्रात प्रचारसभा हो....
अधिक वाचा