ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

५ वर्षातली पंतप्रधान मोदींची पहिली पत्रकार परिषद,पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर नाही

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2019 05:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

५ वर्षातली पंतप्रधान मोदींची पहिली पत्रकार परिषद,पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर नाही

शहर : देश

भाजप अध्यक्ष अमित शहा दिल्लीतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत आहेत. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहे. गेल्या वर्षातली ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली पत्रकार परिषद आहे.अमित शहा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं की,' सरकारने ५० कोटी गरिबांचं जीवनमान उंचावलं आहे. जगभरात भारताचा मान वाढला आहे. देशातील सव्वा कोटी लोकांच्या मनात मोदींच्या नेतृत्वाच देश सुरक्षित असल्याची भावना आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक यशस्वी योजना आणल्या. महिलांसाठी अनेक प्रकल्प राबवले. सगळ्या वर्गामध्य़े आत्मविश्वास भरण्याचं काम सरकारने केलं आहे. या निवडणुकीत पहिल्यांदा महागाई आणि भ्रष्टाचारला मुद्दा नव्हता. जनतेमध्ये मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची लाट होती.'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर नाही दिलं. त्यांनी म्हटलं की, 'मी पक्षाचा अनुशाषित कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष उत्तर देतील.' 

मागे

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिका ही पक्षपाती होती - राहुल गांधी
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिका ही पक्षपाती होती - राहुल गांधी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिका ही पक्षपाती होती, हे दुर्....

अधिक वाचा

पुढे  

निवडणूक निकालाआधी हालचालींना वेग, नायडूंनी घेतली शरद पवार यांची भेट
निवडणूक निकालाआधी हालचालींना वेग, नायडूंनी घेतली शरद पवार यांची भेट

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शुक्रवारी दिल्लीचे मुख्....

Read more