ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चला मतदान करुया ! माधुरी दीक्षितसह सदिच्छादुतांचे आवाहन

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 06:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चला मतदान करुया ! माधुरी दीक्षितसह सदिच्छादुतांचे आवाहन

शहर : मुंबई

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत मतदार जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सुप्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यामार्फत 'चला मतदान करुयाही मोहिम चित्रफितीच्या रुपाने राबविण्यास सुरुवात झाली आहे.

या चित्रफितीद्वारे श्रीमती. दीक्षित या लोकशाही प्रक्रिया आणि देशाच्या विकासात जागरुक मतदारांच्या भूमिकेचे महत्व समजावून सांगताहेत. मतदार जागृतीच्या मोहिमेला कलाक्रीडासाहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध  मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ मिळाली आहे.

या सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण सन्मानित अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकरज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिकअभिनेते प्रशांत दामलेअभिनेत्री मृणाल कुलकर्णीडॉ.निशिगंधा वाडराष्ट्रीय पुरस्कार सन्मानित अभिनेत्री उषा जाधवमहिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाअर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबरअर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडेकॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या नेमबाज राही सरनोबततृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंतदिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही याच 12 सदिच्छादूतांनी मतदारांना मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्याचे आवाहन केले होते. समाजमाध्यमेमुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलकभित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

 

मागे

मतदारांच्या सुविधेसाठी 5400 मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरीत
मतदारांच्या सुविधेसाठी 5400 मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरीत

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी सुरु असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी ....

अधिक वाचा

पुढे  

विधानसभा निवडणूक काळात राज्यात 3 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त
विधानसभा निवडणूक काळात राज्यात 3 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून मागील ती....

Read more