By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 10, 2020 09:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मध्यप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालही आज आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडत भाजपचं ‘कमळ’ हाती घेतलं होतं. यावेळी त्यांच्या २२ समर्थक आमदारांनीही राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कलमनाथ सरकारला पायउतार व्हावं लागलं आणि भाजप पुन्हा सत्तेत आली. आता या ठिकाणी पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज आहे. त्यामुळे शिवराजसिंह चौहान सत्ता राखणार की कमलनाथ पुन्हा सत्तेवर येणार हे आज स्पष्ट होणार आहे. दरम्यान, काँग्रेस किंवा कमलनाथ यांना पुन्हा सत्तेवर येणं सहजसोपं नक्कीच नाही. कारण, मध्यप्रदेशच्या 230 सदस्यीय विधानसभेत सध्या भाजपचे 107 तर काँग्रेसचे 87, बसपा 2, सपा 1 आणि 4 अपक्ष आमदार आहेत. मध्यप्रदेश विधानसभेची प्रभावी संख्या 229 च्या आधारावर बहुमताचा आकडे 115 आहे. अशावेळी भाजपला सत्ता राखण्यासाठी 8 जागा जिंकणे गरजेचं आहे. तर काँग्रेसला 28 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा सत्तेत येणं नक्कीच सोपं नाही. तर दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदे आणि स्वत: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
उत्तरप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला अवघ्या काही क्षणात सुरुवात होत आहे. कोरोनाच्या धर्तीवर मतमोजणीसाठी प्रशासनाकडून सर्व उपाययोजना केल्या आहेत.
बिहारच्या रणसंग्रामाचा निकालही आज
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकालही आज लागणार आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांची ‘कंदिल’ चमकणार की नितीश कुमार यांचा ‘बाण’ निशाण्यावर लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या. यात 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला 243 जागांसाठी मतदान झाले. बिहारमधील प्रत्येक जिल्ह्यात तीन मतमोजणी केंद्रे तयार केली गेली आहेत. तीन मतमोजणी केंद्रे ही तुलनेने जास्त असून, काही विशेष जिल्ह्यांमध्येच त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्व जिल्हा चंपारण (12 विधानसभा मतदारसंघ), गया (10 विधानसभा मतदारसंघ), सिवान (8 विधानसभा मतदारसंघ) आणि बेगूसराय (7 विधानसभा मतदारसंघ) अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. बिहारच्या इतर जिल्ह्यांत एक-दोन मतमोजणी केंद्रे सुरू केली आहेत.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Results 2020) लागण्यासाठी अवघे काही तास ....
अधिक वाचा