ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मध्य प्रदेशचा निर्णय उद्या; राज्यपालांकडून बहुमत चाचणीचे आदेश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 15, 2020 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मध्य प्रदेशचा निर्णय उद्या; राज्यपालांकडून बहुमत चाचणीचे आदेश

शहर : देश

गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशात सुरु असलेले राजकीय नाट्य निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी शनिवारी रात्री काँग्रेस सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी मध्य प्रदेश विधानसभेत कमलनाथ सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. यावेळी बहुमत सिद्ध करून सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान कमलनाथ सरकारपुढे असेल.

मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ही राजकीय उलथापालथ सुरु झाली होती. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. मात्र, कमलनाथ यांनी आपण बहुमत चाचणीसाठी तयार असल्याचे सांगत भाजपविरोधात दंड थोपटले होते.

मध्य प्रदेश विधानसभेत एकूण २३० जागा आहेत. यामध्ये काँग्रेसचे ११४ तर भाजपचे १०९ आमदार आहेत. तर समाजवादी पक्षाचा एक, बसपाचे दोन आणि चार अपक्ष आमदार आहेत. यापूर्वी सपा, बसप आणि अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा होता. मात्र, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यानंतर ही समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसकडून शनिवारी आपल्या आमदारांसाठी व्हीप जाहीर करण्यात आला. विधानसभेत उपस्थित राहून सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा आदेश आमदारांना देण्यात आला आहे.

मागे

आमदारांना ३० लाखांपर्यंतची गाडी, ५ वर्षांचे व्याज सरकार भरणार
आमदारांना ३० लाखांपर्यंतची गाडी, ५ वर्षांचे व्याज सरकार भरणार

राज्यातील आमदार आता स्वतःसाठी ३० लाख रुपयांपर्यंतची आलिशान गाडी घेऊ शकणार ....

अधिक वाचा

पुढे  

मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित
मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित

मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्य....

Read more