By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 25, 2019 08:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
लोकसभा निवडणूक २०१९ च्या पहिल्या टप्प्यात अमरावती मतदार संघातून शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करायला निघालेल्या आनंदरावांनी एक रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं. या रॅलीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते... मात्र 'ऑडी' या आलिसान गाडीमध्ये बसून... शिवसैनिक उन्हात पायपीट करत असताना शिवसेनेचे युवराज मात्र अलिशान ऑडीतून जात होते.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतही नाराजी नाट्य दिसून येतंय. अमरावतीचे लोकसभेचे उमेदवार आनंदाराव अडसूळ यांच्या समोरच्या अडचणी वाढल्यायत. अडसुळांविरोधात स्थानिक शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झालेत. त्यांनी आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केलीय. अडसुळांविरोधात नाराज आहोत, पण पक्षाचं काम निष्ठेनं करू असं आश्वासन कार्यकर्त्यानी उद्धव ठाकरेंना दिलंय.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर य....
अधिक वाचा