ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 05:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड

शहर : मुंबई

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपा नेते कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आलीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. उद्या विधानसभेच्या अधिवेशनात नव्या आमदारांचा शपथविधी पार पडेल, अशी माहिती नवे अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी दिलीय. नुकतेच, राजभवनात कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.

उल्लेखनीय म्हणजे, सगळ्यात ज्येष्ठ नेत्याची निवड विधानसभेच्या अध्यक्षपदी करण्याचा प्रघात आहे. त्यानुसार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची या पदावर निवड होणं अपेक्षित होतं. परंतु, प्रथम शिवसेना त्यानंतर नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करणाऱ्या कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. राज्यपालांनी हा निर्णय का घेतला? कुणाच्या शिफारसीनंतर घेतला? हा प्रश्न अनेकांना पडलाय.

तसंच कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यामध्ये भाजपचा आणखीन काही राजकीय डाव आहे का? याची शक्यतादेखील तपासली जातेय.

मंगळवारी महाराष्ट्रातल्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या दिसल्या. बहुमत चाचणी ही उद्याच (दि २७ नोव्हेंबर) घ्या, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं देतानाच बहुमत चाचणीचं लाईव्ह टेलिकास्ट करण्याचे आदेश दिले. तसंच गुप्त पद्धतीनं ही बहुमत चाचणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजीनामा सोपवला. त्यानंतर, बहुमताच्या संख्येअभावी आपण राजीनामा देत असल्याचं सांगत मुख्यमंत्रीपदाची पुन्हा एकदा शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनीही आपला राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवला. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत फडणवीस-पवार सरकार कोसळलंय.आता या राजकीय घडामोडींमध्ये उद्याचा दिवसही महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी बहुमत चाचणीत यश मिळवणार का? तेही उद्या विधानसभेत दिसून येईल.

 

मागे

एकाच दिवशी वाढदिवस, एकाच दिवशी शपथ, एकाच दिवशी राजीनामा
एकाच दिवशी वाढदिवस, एकाच दिवशी शपथ, एकाच दिवशी राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे फडणवीस सरकार ....

अधिक वाचा

पुढे  

अजित दादा We Love u, ट्रायडंटच्या बाहेर समर्थकांची पोस्टरबाजी
अजित दादा We Love u, ट्रायडंटच्या बाहेर समर्थकांची पोस्टरबाजी

महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक वांद्रे येथील ट्रायडंट हॉटेलम....

Read more