By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 12:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघात कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी धनोडी वरुड गावापासून 6 किमी अंतरावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला चढवला. यात देवेंद्र भुयार बचावले असले तरी त्यांची कार मात्र पूर्णतः जळून राख झाली आहे. या घटनेनंतर भुयार यांच्या कार्यकाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. रक्तदाब कमी झाल्याने भुयार यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन देवेंद्र भुयार यांची भेट घेऊन चौकशी केली, वाहनावर हल्ला करून कार जाळण्यात आल्याची कबुली खुद्द पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. देवेंद्र भुयार यांचा वाहन चालक व एका साथीदाराला वरुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोर्शी मतदार संघात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केलंय.
करमाळ्यातही हाणामारी
करमाळ्यात मतदानला गालबोट लागलंय. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांनी असा आरोप केलाय.या मारहाणीत नारायण पाटलांचे कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. कार्यकर्त्यांच्या डोक्यात मारहाण झाल्याने कार्यकर्ता जखमी झाला.
बाळु जगताप, बापुराव जगताप, संतोष देवकर, पिंटु जगताप, औंदुबर खोचरे, गणेश जगताप,अनिल जगताप, सुभाष जगताप या कार्यकर्त्यांना जबर मारहाण व चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. जखमी वर टेंभुर्णी येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलीय.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. प्रत्येक पक्षाच्या शक्तीप्रदर्शनानंतर अख....
अधिक वाचा