By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2019 03:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आतापर्यंत स्पष्ट झाला आहे. 2014 पेक्षा 2019 चा निकाल हा थोडा धक्कादायक आणि अनपेक्षित असा ठरला. भारतीय जनता पार्टीने 220 जागांच्या विजयाचा दावा केला होता मात्र महाराष्ट्राच्या जनतेचा कौल मात्र वेगळाच आहे. पण महायुतीने महाराष्ट्राची सत्ता राखल्याचं या निकालावरून दिसत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने देखील चांगलाच कमबॅक केला आहे.
भाजपला महाराष्ट्रात भरघोस मत मिळावं याकरता 'महाजनादेश'च्या माध्यमातून जिल्ह्याजिल्ह्यात सभा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह आले. पण या 'महाजनादेश'वर शरद पवारांवर पडलेली एक पावसाची 'सर' भारी पडल्याचं स्पष्ट होत आहे. केंद्रात बहुमताने सत्ता आल्यानंतर आणि महायुती कायम राहिल्यानंतर भाजप-शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला होता. भाजप सरकारने 5 वर्षांच्या कामाचा प्रचार करण्यासाठी 'महाजनादेश' यात्रा काढली. 'महायुती 220 पार' अशा घोषणा केलेल्या सरकारने विरोधी पक्षातले आमदार फोडले, शरद पवारांच्या मागे 'ईडी' प्रकरण लावले असं असताना शरद पवार डगडमगले नाहीत. शरद पवारांनी त्यांच्या शेवटच्या प्रचार सभेतून केंद्राला आव्हान दिले.
Respect , he is 78 and fought alone with all muscle and might of BJP #SharadPawar pic.twitter.com/I3sr8z1nCx
— Good Guy (@gooljaar) October 24, 2019
पक्षातले खासदार, आमदार सोडून गेल्यावर शरद पवार डगमगले नाहीत. आजूबाजूची परिस्थिती कितीही नकारात्मक असली, शरिर अस्वास्थ जाणवत असले तरीही शरद पवार एकट्याने लढले आणि त्याचा परिणाम आपल्याला निकालात पाहायला मिळाला. शरद पवारांची भर पावसातील सभा फायद्यात ठरली अशी चर्चा रंगली. शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी विजयी केले. सोशल मीडियावर पुन्हा एकदा शरद पवार 'ट्रेंड' झाले आहेत. शरद पवारांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Respect , he is 78 and fought alone with all muscle and might of BJP #SharadPawar pic.twitter.com/I3sr8z1nCx
— Good Guy (@gooljaar) October 24, 2019
मोदी आणि शाह यांनी ज्या उमेदवारांकरता सभा घेतल्या त्या उमेदवारांचा पराभव झाला. पण पवारांनी एका सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये जोश भरला आणि हा जोश निकालात स्पष्ट झाला आहे.
While Rahul Baba was enjoying holiday in Bangkok, #SharadPawar was alone fighting against massive wave of BJP SENA, Congress is dying because lack of leadership.#ElectionResults2019 pic.twitter.com/QVrUM2wG5H
— Sarcastic π (@SARCASTIC_PI) October 24, 2019
विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये राज्यातील अन....
अधिक वाचा