ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपने निवडला आपला विधिमंडळ नेता

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2019 03:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपने निवडला आपला विधिमंडळ नेता

शहर : मुंबई

भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडला आपला विधिमंडळ नेता निवडला आहे. देवेंद्र फडणवीस यांची एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. विधानभवन परिसरात भाजपचा जोरदार कार्यक्रम सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. देवेंद्र फडणवीस तीन टर्म पूर्ण करोत, अशा शुभेच्छाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या. भाजपच्या केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर यांच्या नेतृत्त्वात ही प्रक्रिया सुरू झाली. देवेंद्र फडणीस यांच्या विधिमंडळ नेतेपदासाठी चंद्रकांत पाटलांचा प्रस्तावावर सुधीर मुनगंटीवार, हरीभाऊ बागडे, सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, गणेश नाईक, देवराव होळी, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले. नरेंद्र सिंग तोमर यांनी विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांनी निवड करण्यात आली आहे.

वसंतराव नाईक यांची टर्म 11 वर्षांची होती, त्यांचा रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. आज सर्वजण खूप आनंदात आहोत. राज्यात बिगर काँग्रेस सरकार पुन्हा आले. पाच वर्षे सलग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टर्म पूर्ण केली. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा 11 वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस तोडतील. राज्यात सर्वाधिक जागा मिळलेला आपला पक्ष आहे. वयाचा आणि अनुभवाचा आदर आमच्याही मनात आहे. पण वस्तूस्थिती ही वस्तूस्थिती आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

विधिमंडळाच्या बैठकीत पराभूत पंकजा मुंडेंचाही समावेश...

परळी विधानसभा मतदार संघातून मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागलेल्या पंकजा मुंडे यांनी विधिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतरही त्यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती. त्यातच त्यांनी विधिमंडळाच्या बैठकीत उपस्थिती लावून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला सुरुवात केली.

 

 

मागे

आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा रद्द
आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा रद्द

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची ....

अधिक वाचा

पुढे  

2014 आणि 2019 मध्ये मला संधी दिल्याबद्दल आभार, मी पुन्हा येणार : देवेंद्र फडणवीस
2014 आणि 2019 मध्ये मला संधी दिल्याबद्दल आभार, मी पुन्हा येणार : देवेंद्र फडणवीस

भाजपने आज देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्त....

Read more