ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा?; जाणून घ्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 16, 2019 12:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा?; जाणून घ्या

शहर : मुंबई

अनेक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी पार पडला. राज्यपाल भवनामध्ये 13 नव्या मंत्र्यांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडून शपथ देण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला सर्वाधिक 5 मंत्रिपदे मिळाली असून त्याखालोखाल मुंबईला 3 मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

विदर्भातून डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, परिणय फुके, तानाजी सावंत, अशोक उईके यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. तर मुंबईतून भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार योगेश सागर, आरपीआयकडून अविनाश महातेकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मराठवाड्यातून अतुल सावे, नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातून माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातून पुणे ग्रामीण भाजपा अध्यक्ष बाळा भेगडे, सांगलीतील भाजपा आमदार सुरेश खाडे यांना मंत्रिपद देण्यात आले आहे.   

विदर्भातील एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आता चार मंत्री झाले. पहिल्यांदाच 4 मंत्री एका जिल्ह्याला मिळाले आहेत. संजय राठोड महसूल राज्यमंत्री शिवसेनेचे, मदन येरावर, ऊर्जा राज्यमंत्री भाजपचे, डॉ.प्राचार्य अशोक उईके(आमदार भाजप, राळेगाव) डॉ. तानाजी सावंत(विधान परिषद सदस्य, शिवसेना यवतमाळ) हे मंत्री झालेले आहेत.

 

मागे

आमचं सरकार भ्रष्ट शासन देणार; उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
आमचं सरकार भ्रष्ट शासन देणार; उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

नुकत्याच आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या पी. पुष्पा ....

अधिक वाचा

पुढे  

जाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे?
जाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारा....

Read more