ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्राच्या राजकारणात गमतीशीर घडना; विरोधी पक्षनेता थेट कॅबिनेट मंत्री

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 16, 2019 10:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात गमतीशीर घडना; विरोधी पक्षनेता थेट कॅबिनेट मंत्री

शहर : मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात एक गमतीशीर घडना घडली आहे. विरोधी पक्षनेता असलेली व्यक्ती थेट कॅबिनेट मंत्रिपदी गेल्याचे या सरकारमध्ये एकदा नव्हे दोनदा घडले आहे. सर्वप्रथम भाजप सरकार स्थापन झाल्यावर तीन-चार महिने शिवसेना विरोधी पक्षात होती. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. त्यानंतर शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली आणि शिंदे विरोधी पक्षनेत्याचे थेट कॅबिनेट मंत्री झाले. आता तर भाजपने चक्क विरोधी पक्षनेत्यालाच काँग्रेसमधून फोडले आहे. फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. तेरा जण आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे भाजपाचे आमदार अतुल सावे, मोर्शीचे भाजपाचे आमदार डॉ. अनिल बोंडे, संजय कुटे, योगेश सागर आणि रिपाई नेते अविनाश महातेकर यांचा समावेश आहे. तर नागपूरचे परिणय फुके आणि यवतमाळच्या राळेगावचे अशोक उईके यांचा मंत्रिमंडळातले अनपेक्षित चेहरे आहेत. तर पाच विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरीश अत्राम, यांनाही डच्चू मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिवसेनेला मंत्रीमंडळ विस्तारात दोन मंत्रीपदं मिळणार आहेत. दोन्ही कॅबिनेट मंत्रिपदं असतीलया पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांची नावं दिली आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आणि कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांना तुर्त मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालेले नाही.

 

मागे

उद्धव ठाकरे रामजन्मभूमीवर दाखल; शिवसैनिकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन
उद्धव ठाकरे रामजन्मभूमीवर दाखल; शिवसैनिकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या १८ खासदारांसह अयोध्येला रव....

अधिक वाचा

पुढे  

धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची बैठक
धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची बैठक

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक विध....

Read more