ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 17, 2019 11:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

शहर : मुंबई

फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा सकाळी पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. विनोद तावडे यांचं शालेय शिक्षणमंत्री पद आता आशिष शेलार यांना देण्यात आलं आहे. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण खातं दिलं आहे.

विनोद तावडे यांचं याआधीच वैद्यकीय शिक्षण खातं काढून घेण्यात आलं होतं. आता शालेय शिक्षण आणि क्रीडा खातंही त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं आहे. तर विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते असताना प्रकाश मेहता यांच्यावर एमपी मिल कपाऊंड एसआरए प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप केले होते. मेहता यांच्याकडील हे खातं आता विखे पाटील यांना देण्यात आलं आहे.

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप

कॅबिनेट मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील- गृहनिर्माण

आशिष शेलार- शालेय शिक्षण, क्रीडा युवा कल्याण

संजय कुटे- कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग कल्याण

सुरेश खाडे- सामाजिक न्याय 

डॉ. अनिल बोंडे- कृषी

डॉ. अशोक उईके- आदिवासी विकास

जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)- रोजगार हमी फलोत्पादन

तानाजी सावंत (शिवसेना)- जलसंधारण

राम शिंदे- पणन वस्त्रोद्योग

संभाजी पाटील निलंगेकर- अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण

जयकुमार रावल- अन्न औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार

सुभाष देशमुख- सहकार, मतद पुनर्वसन

राज्यमंत्री

योगेश सागर- नगरविकास

अतुल सावे- उद्योग आणि खणिकर्म, अल्पसंख्याक विकास वक्फ

संजय उर्फ बाळा भेगडे- कामगार, पर्यावरण, मदत पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन

परिणय फुके- सार्वजनिक बांधकाम, वने, आदिवासी विकास

अविनाश महातेकर- सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य

मागे

'त्या' घोटाळ्याची माहिती दडवण्यासाठी विखेंना कॅबिनेट मंत्रिपद- अजित पवार
'त्या' घोटाळ्याची माहिती दडवण्यासाठी विखेंना कॅबिनेट मंत्रिपद- अजित पवार

मुंबईच्या विकास आराखड्यातील (डीपी) घोटाळ्याची आणखी माहिती पुढे येऊ नये, यास....

अधिक वाचा

पुढे  

आयाराम, गयाराम...जय श्री राम; विरोधकांचा विखे-पाटील, क्षीरसागरांना टोला
आयाराम, गयाराम...जय श्री राम; विरोधकांचा विखे-पाटील, क्षीरसागरांना टोला

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरु....

Read more