By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 04:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी उलथापालथ झाली. दोन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर आता राजकीय पेच आणखी वाढला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज 24 तासांच्या आत बहुमत सिध्द करण्यास सांगितले होते. त्यामुळं उद्या होणाऱ्या फ्लोअर टेस्ट आधीच अजित पवार यांनी घेतलेला निर्णय धक्कादायक होता. याआधी शरद पवारांनी आपले अस्त्र वापरत अजित पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी सोमवारी छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. मात्र अखेर पवारांचे मन वळवण्यासाठी घरचा माणूसच कामी आला.
सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रात उद्या बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. अशातच अजित पवार यांनी ऐनवेळी राजीनामा दिल्याने भाजपची मोठी अडचण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमताचा 145 हा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. मात्र अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपची नाचक्की झाली आहे.
सलग चार दिवस अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी अनेक नेते गेले होते. मात्र आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी सकाळी 8 वाजता हॉटेल ट्रायडंटमध्ये भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. त्यानंतरच अजित पवार यांनी हा निर्णय घेतला असावा, अशा शक्यता वर्तवल्या जात आहे.
अजितदादांसमोर उरले होते 2 पर्याय
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता अजित पवार यांच्यासाठी दोन पर्याय शिल्लक होते. पक्षात परत या..अन्यथा निलंबन, शरद पवार यांना टोकाचा निर्णय घ्यावा लागला असता. अजित पवार यांना पक्षातून निलंबित करावे लागणार होते. त्यामुळं अजित पवार यांनी हा निर्णय घेतला असावा.
दिल्लीत मोदी-शाह सक्रिय
नरेंद्र मोदींनी अमित शहा यांच्याशी महाराष्ट्राबद्दल तासभर चर्चा केली. जे. पी. नड्डा हेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात महाराष्ट्राविषयी चर्चा केली. या बैठकीनंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना देण्याची शक्यता आहे. भाजपची सगळी मदार राष्ट्रवादीतून बंडखोरी करून आलेले अजित पवार यांच्यावर होती. त्यांचं मन वळवण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आल्याचं समजतं. आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त खरं असेल तर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आपण राज्यपालां....
अधिक वाचा