ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आघाडी जिंकली, पण भाजपच नंबर वन; आता सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 19, 2021 12:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आघाडी जिंकली, पण भाजपच नंबर वन; आता सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

शहर : मुंबई

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकून एकीचं बळ दाखवून दिलं आहे. मात्र, पक्षनिहाय आकडेवारी पाहता भाजपने सर्वाधिक जागा जिंकून राज्यात आपणच नंबर वन असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाच्या तर शिवसेना आणि काँग्रेसने अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या आहेत. सर्वाधिक जागा जिंकून भाजप नंबर वनचा पक्ष ठरला असला तरी सरपंच निवडीमध्ये मात्र भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आतापासूनच सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

राज्यातील 13,833 ग्रामपंचायतींपैकी 13,769 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यात भाजपने 3,263, राष्ट्रवादीने 2,999, शिवसेनेने 2,808, काँग्रेसने 2,151, मनसेने 38 आणि स्थानिक गटांनी 2,510 जागा जिंकल्या आहेत. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीतील सर्वच्या सर्व जागा राजकीय पक्षांनी जिंकल्या आहेत. त्यामुळे तिथे सरपंचाची निवड सोपी जाणार आहे. परंतु, ज्या पंचायतमध्ये संमिश्र कौल आलेला आहे, त्या ठिकाणी मात्र सरपंचाच्या निवडीसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

काँग्रेसलाही बळ

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून 2014नंतर पहिल्यांदाच काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. चौथ्या क्रमांकावर का असेना पण काँग्रेसने दोन हजाराहून अधिक जागा जिंकून मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. प्रत्येक निवडणुकीत होणाऱ्या पराभवामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना नैराश्याने घेरले होते. मात्र, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी मिळण्याची शक्यता आहे, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

पालिकेत सत्तांतर होणार?

दरम्यान, या ग्रामपंचायतींच्या निकालाच्या अनुषंगाने आता महापालिकान निवडणुकीची गणितं मांडली जात आहेत. ग्रामपंचायतीमधील विजय म्हणजे आगामी ठाणे, नवी मुंबई, मुंबई महापालिका निवडणुकीच्या विजयाची नांदी आहे, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितलं. ग्रामपंचायत निवडणूक आणि पालिका निवडणुकीचा तसा काहीच संबंध नसतो. पण पालिका निवडणुकीत कडवी झुंज देण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीचा विजय अत्यंत महत्त्वाचा असल्याचा मानला जात आहे. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपला हा आत्मविश्वास आवश्यक होता. आता या आत्मविश्वासाच्या बळावरच भाजप पालिका निवडणुकीत चमत्कार घडवू शकते, असं राजकीय निरीक्षकांना वाटतं.

या निवडणुकीने काय दिले?

ग्रामपंचायत निवडणुकीने राजकीय पक्षांना अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. भाजपला पुन्हा नंबर वनचं स्थान देऊन महाविकास आघाडीशी टक्कर देऊ शकतो हा आत्मविश्वास या निवडणुकीने भाजपला दिला. शिवसेनेला ग्रामीण भागात मोठं यश देऊन ग्रामीण भागात पक्ष विस्तार करण्याची संधी निर्माण करून दिली. राज्यात दोन्ही काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय शिवसेनेचा निर्णय योग्यच होता, यावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब झालं. काँग्रेसने 13 जिल्ह्यात दमदार कामगिरी केली. दोन हजाराच्यावर जागा मिळवल्या. त्यामुळे सर्व काही संपलं नाही, एकदिलाने लढलो तर गतवैभव मिळवणं सहज शक्य आहे, हा आत्मविश्वास या निवडणुकीने काँग्रेसला दिला आहे. तर राज्यात नंबर वन होण्याची संधी आहे. ग्रामीण भागात आपली पकड अजूनही मजबूत आहे, हे या निवडणुकीने राष्ट्रवादीला दाखवून दिलं. त्यामुळे हे चारही पक्ष येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जिंकण्याच्याच जिद्दीने उतरतील, त्यामुळे प्रत्येक निवडणूक चुरशीची आणि रंजक होईल, असं जाणकारांना वाटतं.

 

मागे

महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची भेट, पवारांनाही भेटणार
महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची भेट, पवारांनाही भेटणार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फड....

अधिक वाचा

पुढे  

कोल्हापूरकरांचा नाद करायचाच नाही; माजी सरपंचाच्या पत्नीला धूळ चारुन साफसफाई करणाऱ्या आजीबाईंचा विजय
कोल्हापूरकरांचा नाद करायचाच नाही; माजी सरपंचाच्या पत्नीला धूळ चारुन साफसफाई करणाऱ्या आजीबाईंचा विजय

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या (Gram Panchayat results) सोमवारी जाहीर झालेल्या निक....

Read more