ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शरद पवारांची प्रकृत्ती उत्तम, पण राज्यभरात न फिरण्याची विनंती करणार- टोपे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 17, 2020 12:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शरद पवारांची प्रकृत्ती उत्तम, पण राज्यभरात न फिरण्याची विनंती करणार- टोपे

शहर : मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. तेव्हा त्यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली होती. मात्र, आता खबरदारी म्हणून त्यांना राज्यभरात फिरण्याची विनंती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते सोमवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.यावेळी राजेश टोपे यांनी शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पवार साहेबांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी काम करणारे दोघे जण पवार साहेबांचे तीन सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. हे सगळे सुरक्षारक्षक लोकांना पवार साहेबांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यातून ते काही लोकांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.यावेळी राजेश टोपे यांनी लवकरच कोरोनावरील भारतीय लस उपलब्ध होईल, असे सांगितले. कोरोनाच्या लसीवर ऑक्सफर्ड आणि सिरममध्ये मानवी चाचण्या सुरु आहेत. सध्याची परिस्थिती पाहता आगामी दीड ते दोन महिन्यात कोरोनावरील भारतीय लस उपलब्ध होऊ शकते असे टोपे यांनी सांगितले.

 

मागे

'जगाचं राहू द्या साहेब, आधी देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या'
'जगाचं राहू द्या साहेब, आधी देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या'

भारताकडे जागतिक अर्थव्यवस्थेला गती देण्याची क्षमता आहे, असा दावा मोदी सरका....

अधिक वाचा

पुढे  

तुम्ही खचलात, उन्मळून पडलात, तर मला जास्त त्रास होईल, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
तुम्ही खचलात, उन्मळून पडलात, तर मला जास्त त्रास होईल, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

मनसेचे नांदेड शहराध्यक्ष सुनील इरावर यांनी 16 ऑगस्टला आत्महत्या केली. याप्र....

Read more