By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2020 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली भाषा बोलण्याचा अधिकार आहे. लेखिका शोभा देशपांडे यांच्या मतांशी सहमत नाही, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी एकच खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे मराठमोळ्या लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सला मनसेने चोप दिला होता. शोभा देशपांडे यांनी 12 तासांहून अधिक काळ कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सच्या दुकानासमोर आंदोलन केले. दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध शोभा देशपांडेंनी रात्रभर ठिय्या मांडल्यानंतर सकाळी आंदोलनस्थळी आलेले मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुकानदाराला चोप दिला. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लेखिका शोभा देशपांडे यांच्या मताशी सहमत नसल्याचं सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे.
बिहारमध्ये शिवसेनेची ताकद नाही. भाजपाला फटका बसणार नाही. लालूप्रसाद यादव कारागृहामधून बाहेर पडले तरी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला फरक पडणार नसल्याचंही रामदास आठवलेंनी सांगितलं आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसलेंवर घणाघाती टीका केली होती. एक राजा तर बिनडोक आहे, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा असं म्हणतात, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजेंवर निशाला साधला होता. त्याचाच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
छत्रपतींना बिनडोक म्हणणे योग्य नाही. MPSC परीक्षा झाली पाहिजे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाला अडचण असल्याने MPSC परीक्षा रद्द करू नये. महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधान विरोधी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली भाषा बोलण्याचा अधिकार आहे. शोभा देशपांडे यांच्या मतांशी सहमत नाही, असंही आठवलेंनी सांगितलं आहे. बिहारमध्ये शिवसेनेची ताकद नाही. भाजपाला फटका बसणार नाही. लालूप्रसाद यादव कारागृहामधून बाहेर पडले तरी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला फरक पडणार नसल्याचंही रामदास आठवलेंनी सांगितलं आहे.
‘एक राजा तर बिनडोक आहे. असं मी म्हणेन, दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, असं मला दिसतंय’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तुम्ही उदयनराजेंना अंगावर घेताय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘मी अंगावर घ्यायला कोणालाच भ्यायलेलो नाही. ज्या माणसाला घटना माहिती नाही. आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं ते म्हणतात. भाजपने यांना राज्यसभेवर कसं पाठवलं तेच कळत नाही’ असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा मराठा समाज स्वीकारणार का, हा प्रश्न आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
‘सुरेशदादा पाटील यांच्याशी बोलणं झालं. 10 ऑक्टोबरच्या मराठा आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षण वेगळं आणि ओबीसी आरक्षण वेगळं, कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणात मागणी करु नका, ही त्यांना विनंती केल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. सामंजस्य बिघडताना दिसत असल्याने आम्ही पाठिंबा जाहीर केला. आरक्षण संघर्ष समिती किंवा इतरांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबण्याची विनंती आहे. फाटे फोडण्याचा प्रयत्न करुन मराठा संघटनांत कलह होण्याची शक्यता आहे. त्यातून आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रातील सामंजस्य बिघडू नये, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोस....
अधिक वाचा