By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 12:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महाराष्ट्रात प्रचारसभा होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये राहुल गांधी यांची प्रचारसभा होणार आहे. तर, शिर्डी लोकसभा मतदारसंघात चौथ्याच्या टप्प्याच्या प्रचारासाठी राहुल गांधी येत आहेत. शिर्डीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे आणि काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांच्यात थेट लढत होणार आहे. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नांदेड इथे सभा झाल्या आहेत. तर पुण्यात त्यांनी विद्यार्थ्यांशी खुला संवाद साधला होता. मात्र मुंबईतल्या प्रचाराकडे काँग्रेसचं दुर्लक्ष झाल्याची चर्चा रंगत आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत आज भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. संध्याकाळी पंतप्रधान मोदींची बांद्रा कुर्ला संकुलात प्रचारसभा होणार आहे. या सभेला उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकत्र मंचावर दिसणार आहेत. मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांसाठी ही प्रचारसभा होत आहे. मुंबईत मोदींची पहिली सभा घेत मुंबईतल्या प्रचारात आता भाजपने आघाडी घेतलीय.
ईशान्य मुंबईतील लोकसभा मतदार संघात सकल मराठा समाज बांधवांकडून राष्ट्रवाद....
अधिक वाचा