By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 25, 2019 08:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच आता वेगळं वळण घेत आहे. इतके दिवस वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असणाऱ्या भाजपने शनिवारी राजकीय वर्तुळात भूकंपाचे हादरे दिले आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्ममंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाविकासआघाडीकडे बहुमत असताना आणि सत्तास्थापनेचा दावा करणार असताना आधीच भाजपने शपथविधी उरकल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने शपथविधीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. भाजपकडे सध्या 105 आमदार आहेत तर 15 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्यानं भाजपनं 120 आमदार आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. बहुमताचा आकडा 145 असल्यानं त्यांना आणखी आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून ऑपरेशन लोटस मोहीम आखण्यात आली आहे.राज्यात राजकीय घडामोडींना वेग
ऑपरेशन लोटसच्या भीतीनं शिवसेना आमदारांना दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे. सकाळी अकराच्या सुमारास लेमन ट्रीमध्ये नेणार असल्याची माहिती समोर आली आहे. फोडाफोडीच्या राजकारणापासून आमदारांना दूर ठेवण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीनं शिवसेनेकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवसेनेचे आमदार फुटणार, अजित पवारांना भेटल्यानंतर या आमदाराचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या बंडानंतर सगळ्याच पक्षांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपले आमदार हॉटेलमध्ये सुरक्षीत ठेवले आहेत. असं असलं तर कोण फुटणार याची चर्चा होतेय. राष्ट्रवादीतून बंडकरून उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांची रविवारी अनेक आमदारांनी भेट घेतली. भाजपप्रणित अपक्ष आमदार रवी राणा यांनी रात्री अजित पवारांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी खळबळजनक दावा केला. ते म्हणाले, शिवसेनेचे अनेक आमदार अस्वस्थ असून ते फुटणार आहेत. लवकरच ते कळेल असंही त्यांनी सांगितलं. रवी राणा यांच्या शिवाय अनेक आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. यात भाजपच्याही आमदारांचा समावेश होता.
काय आहे भाजपचं ऑपरेशन लोटस?
महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा पेच आता निर्णायक वळणावर आलाय. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिलाय. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना जे संख्याबळ जमवायचं आहे त्याची जबाबदारी भाजपने काही दिग्गज नेत्यांवर सोपवली आहे. 'ऑपरेशन लोटस' यशस्वी करण्यासाठी हे चारही नेते कामाला लागले असून विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजप आता निर्णायक लढाई लढत आहे. बहुमत जमवणं हे भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेचं झालं असून त्यासाठी काहीही करण्याची तयारी या नेत्यांनी केलीय. त्यातच मी अजुनही राष्ट्रवादीतच असून शरद पवार हेच माझे नेते आहेत असं ट्विट अजित पवारांनी केल्याने पुन्हा एकदा संभ्रम वाढला असून शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची चिंता वाढली आहे.
भाजपने सत्तास्थापनेची जबाबदारी ज्या नेत्यांवर दिलीय त्यात नारायण राणेंचं....
अधिक वाचा