ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाशिवआघाडीचा फॉर्म्युला काय असणार?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2019 08:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाशिवआघाडीचा फॉर्म्युला काय असणार?

शहर : मुंबई

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला अखेर काँग्रेसने बाहेरून पाठिंबा देण्याचं मान्य केलं आहे. सोनिया गांधींनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर शिवसेनेनं राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठीचा दावा केला. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अद्याप पाठिंब्याचं अधिकृत पत्र आलं नसल्यामुळे आम्हाला काही वेळ हवा अशी मागणी सेनेकडून करण्यात आली. पण त्यासाठी राज्यपालांकडून नकार देण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी पत्रकार परिषद देत ही माहिती दिली आहे. दरम्यान, यासगळ्यावर शिवसेना आणि आघाडी जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर उद्या म्हणजेच 12 नोव्हेंबरला सविस्तर चर्चा होणार असल्याची माहितीही सेनेकडून देण्यात आली आहे.

महाशिवआघाडीचा फॉर्म्युला काय असणार?

एकीकडे आता सत्तेचा हा तिढा सुटण्याची शक्यता असताना आता मुख्यमंत्री कोण होणार याबदद्ल चर्चा सुरू झाली आहे. तब्बल 20 वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे शिवसेनेतून मुख्यमंत्रिपदासाठी काही नावं पुढे येतायत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. पण, महाशिवआघाडीचा फॉर्म्युला काय असणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.दरम्यान, उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री व्हावे असा जोर शिवसेनेच्या नेत्यांकडून धरण्यात आला आहे. पण यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. पण सत्ता वाटपामध्ये सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी आणि अंतर्गत मतभेद रोखण्यासाठी शिवसेना सगळ्यांना समान आणि महत्त्वाची नावं पुढे आणणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी इतर पक्षांचा पाठिंबा मिळणार नाही.

महाशिवआघाडीची चर्चेमध्ये दोन उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये एक उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला तर दुसरं मुख्यमंत्रीपद हे काँग्रेसला देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण असं होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण शिवसेनेची सत्ता असताना, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना त्यांच्या अंतर्गत काम करण्यासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी तयार होणार नाही.

मागे

सत्तानाट्यात सर्वात मोठा ट्विस्ट, काँग्रेसचं पत्र आलं पण…
सत्तानाट्यात सर्वात मोठा ट्विस्ट, काँग्रेसचं पत्र आलं पण…

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. कारण काँग्....

अधिक वाचा

पुढे  

काँग्रेसने केली शिवसेनेची कोंडी
काँग्रेसने केली शिवसेनेची कोंडी

काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा न दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सत्....

Read more