By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 23, 2024 09:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
Maharashtra Politics : पुण्यात पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला होता. आपल्या भाषणात अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
पुण्यात रविवारी भाजपाचा कार्यकर्ता मेळवा पार पडला. या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात भाषण करताना अमित शहा (Amit Shah) आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीवर (Mahaviks Aghadi) जोरदार हल्ला बोल केला. आपल्या भाषणात अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी (Uddhv Thackeray) साथ दिली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी ही औरंगजेब फॅन क्लब आहे. तर या क्लबचे नेते म्हणून उद्धव ठाकरेंची ओळख आहे, अशी जोरदार टीका अमित शाह यांनी केली होती.
शिवसेना शिंदे गटाकडून प्रहार
याच विषयावर आता शिवसेना शिंदे गटानेही आपल्या फेसबुक पेजवर व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. '2019 साली स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी आणि मुस्लीम मतांसाठी भगव्याशी आणि हिंदुत्ववादी विचारांशी फारकत घेऊन उद्धव ठाकरेंनी आपली विचारसरणी बदलून टाकली. हिंदू जनता जुमानत नाही , हे समजल्यावर मतांच्या हव्यासापोटी औरंग्या वृत्तींना पाठबळ देण्याची रणनीती उद्धव ठाकरे आखत आहेत. त्यांच्या याच स्वार्थी वृत्तीचा समाचार पुण्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला.
ज्या काँग्रेसने कायम दहशतवाद्यांना पाठिंबा दिला त्याच काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी साथ दिली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी ही औरंगजेब फॅन क्लब आहे. तर उद्धव ठाकरे या क्लबचे नेते आहे, अशी सडकून टीका यावेळी अमित शहा यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर केली. अमित शहा यांच्या जोरदार टीकेपाठोपाठ शिवसेना पक्षानेही व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. हे व्यंगचित्र पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसारित झाले असून या व्यंगचित्राची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्राच्या मैदानात अमित शाह
भाजपनं केंद्रात सलग तिस-यांदा सत्ता स्थापन केली. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक केली. मात्र लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याची सल भाजप नेत्यांना आहे.. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवण्यासाठी भाजपनं अमित शाहांच्या रुपात आपला हुकमी एक्का मैदानात उतरवलाय. भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीसाठी आलेल्या अमित शाहांनी हॉटेल JW मॅरियटमध्ये रविवारी पहाटेपर्यंत बैठका घेतल्या... आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजप पदाधिका-यांना खास धडे दिले. भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास त्यांनी पदाधिकारी मेळाव्यात बोलून दाखवला
High Court Questions Central Government On New Criminal Laws: उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध....
अधिक वाचा