By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 12, 2019 06:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रात सत्ता नाट्यामध्ये आता हालाचालींना मोठा वेग आला आहे. सध्याची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. संध्याकाळी 5:30 वाजता राज्यात राष्ट्रपती राजवटीची घोषणा करण्यात आली. याच पार्श्वभूमिवर राजभवनावर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यादरम्यान, चारही महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या हायव्होल्टटेज बैठकी मुंबईत होत आहेत. त्यामुळे आता राज्यात आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
एकीकडे राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीसाठी राष्ट्रपती शासनास शिफारस पत्र पाठवण्यात आलं होतं. राजभवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंबंधीचं निवेदन शेअर करण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दरम्यान, यानंतर आता राज्यात चारही पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकी होणार आहेत. जाणून घेऊयात राज्यातील 5 महत्त्वाच्या बातम्या.
1)महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात कलम 356 लागू करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 2014 मध्ये एक महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळूनही या दोन घटकपक्षांमध्ये मतभेद झाले आणि सरकार स्थापन करण्यात युती अपयशी ठरली. त्यानंतर गेले 3 दिवस वेगवान राजकीय घडामोडी घडल्या पण एकही पक्ष पुरेसं संख्याबळ दिलेल्या मुदतीत उभं करू शकला नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
2)शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकाच गाडीतून मातोश्रीवरून निघाले आहेत. ते नेमके कोणाला भेटण्यासाठी निघाले यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती नाही. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या या हालचालींना महत्त्व आहे.
3)काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. यावर थोड्याच वेळात पवारांशी चर्चा करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या बैठकीत आघाडीची रणनीती ठरणार असल्याची माहिती आहे.
4)भाजपच्या कोअर कमिटीची संध्याकाळी 'वर्षा'वर बैठक होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे. यात भाजपचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
5)शिवसेनेच्यावतीने सध्या सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. मात्र, केंद्र सरकारने राष्ट्रपती शासन लागू केली. त्यामुळे आता शिवसेनेला नवीन याचिका दाखल करण्याची वेळ आली आहे. नवीन याचिका तयार करण्याचे काम कपिल सिब्बल आणि त्यांची चमू करीत असून लवकरच ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षात राज्यात राष्ट्रपती लागू करण....
अधिक वाचा