ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्र राज्यातील २७ महानगरपालिकामधील महापौर पदाची सोडत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 13, 2019 05:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र राज्यातील २७ महानगरपालिकामधील महापौर पदाची सोडत

शहर : मुंबई

राज्यातील २७ महानगरपालिकामधील महापौर पदाची सोडत काढण्यात आली आहे. खुला प्रवर्ग, सर्वसाधारणसाठी मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, , कल्याण-डोंबिवली, सांगली, उल्हासनगर या पालिकांसाठी सोडत निघाली आहे. २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात आज काढण्यात आली

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आता ही मुदत २१ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन महापौर आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात परिषद सभागृहात ही सोडत काढण्यात आली. या महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्यानुसार आरक्षण सोडतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे किती महापालिकांत महिलांना संधी मिळणार याचीही उत्सुकता होती.

महापौर पदासाठी कोणते आरक्षण पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आरक्षण सोडतीनंतर २१ नोव्हेंबर रोजी नवीन महापौर, उपमहापौरांची निवड होऊ शकते.

अशी निघाली महापौर सोडत

अनुसुचित जमाती -: वसई विरार अनुसूचित जाती -: मीरा भाईंदर अनुसूचित जाती ( महिला ) - अहमदनगर, परभणी

 मागास प्रवर्ग ( महिला ) -: नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, मालेगाव

 मागास प्रवर्ग -: लातूर, धुळे, अमरावती
 खुला प्रवर्ग, महिला आरक्षित -: नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, चंद्रपूर  

 खुला प्रवर्ग, सर्वसाधारण -: मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, सांगली, उल्हासनगर

 

मागे

मंत्र्यांची पदं संपुष्टात, गाड्या-बंगले परत करण्याचे निर्देश
मंत्र्यांची पदं संपुष्टात, गाड्या-बंगले परत करण्याचे निर्देश

मंत्रीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांसह सर्व माजी मंत्र्य....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आमदार फुटणार नाही - अजित पवार
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आमदार फुटणार नाही - अजित पवार

राज्यात सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे. सत्तासंघर्ष म्हटले की आमदारांची फोडा....

Read more