ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्र विधानसभा 2019 : निवडणुका घोषित

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 21, 2019 12:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र विधानसभा 2019 : निवडणुका घोषित

शहर : delhi

गेल्या वर्षभरात सर्व राजकीय पक्ष वाट पाहत असलेल्या क्षणाची आज निवडणूक आयोगाच्या घोषनेने प्रतीक्षा संपली. ती घोषणा म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका.

गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या राष्ट्रीय पक्षाला गळती आणि भरती झालेल्या परिस्थिती नंतर आणि रथ यात्रा जनादेश यात्रा , रॅली वगैरे संपल्यानंतर आज अखेर निवडणूक आयोगाकडून प्रचंड प्रतिक्षेनंतर घोषित करण्यात आल्या. 20 सप्टेंबर ला ह्या घोषणा केल्या जातील असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. तसेच सूत्रांकडूनही तशी माहिती दिली जात होती. मात्र काल 20 सप्टेंबर रोजी त्याची घोषणा झाली नाही.

महाराष्ट्रासह हरियाणा राज्यात आचारसंहिता लागू केल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रात 288 तर हरियाणा मध्ये 90 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुका 9 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहेत. तर 1.8 ईव्हिएम मशीन चा वापर होणार आहे. तसेच 8.94 कोटी मतदार मतदान करणार आहेत.  निवडणुकीत पैसांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष पथक कार्यरत असणार आहे. तसे प्लॅस्टिक चा वापर टाळावा असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे. तसेच उमेदवारांना त्यांच्या गुन्हेविषयक माहिती आयोगाला योग्य पद्धतीत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील निवडणुका 21 ऑक्टोबर  रोजी घेण्याची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केली. महाराष्ट्रातील निवडणुका 21 ऑक्टोबर ला एकाच टप्प्यात घेण्यात येतील .27 सप्टेंबर ला नोटिफिकेशन काढले जाऊन नॉमिनेशन  4 ऑक्टोबर पर्यंत करता येईल. तर 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेउ शकता येणार आहे.  निवडणुकीचा निकाल 24 सप्टेंबर ला जाहीर केला जाणार आहे.

 

मागे

अन्य राज्यांतील भाषाशिक्षण अधिनियमांचा अभ्यास करुन लवकरच प्रस्तावित मसुदा तयार होईल
अन्य राज्यांतील भाषाशिक्षण अधिनियमांचा अभ्यास करुन लवकरच प्रस्तावित मसुदा तयार होईल

महाराष्ट्रातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यासंद....

अधिक वाचा

पुढे  

जाणून घ्या ! कसा आहे निवडणुकीचा कार्यक्रम ?
जाणून घ्या ! कसा आहे निवडणुकीचा कार्यक्रम ?

आज अखेर बहुप्रतीक्षित विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयुक्त सुनील....

Read more