ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाविकास आघाडीत तणाव! शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2020 10:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाविकास आघाडीत तणाव! शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव

शहर : रत्नागिरी

कोकणात महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे आमदार आणि रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपल्या मतदारसंघात विविध कामांच्या कार्यक्रमाला निमंत्रण न देता सुनील तटकरेंकडून परस्पर उद्घाटनं केली जात आहेत. कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नाही, उद्घाटनाच्या पाटीवर स्थानिक आमदार म्हणून आपले नाव येत नसल्याची खंतही योगेश कदम यांनी व्यक्त केली. योगेश कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पत्राद्वारे सुनील तटकरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे.

12 ऑक्टोबरला तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम एक कार्यक्रम झाला होता. त्यानंतर शिवसेनेनं तटकरेंविरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या उद्घाटनाच्या फोटोनंतर सेना आणि राष्ट्रवादीमध्ये शीतयुद्ध रंगलंय. रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे दापोली विधानसभा मतदारसंघात होणार्‍या विकासकामांच्या भूमिपूजनाला आपणास निमंत्रण देत नाहीत. तसेच आपल्याला विश्‍वासात न घेता कार्यक्रम करत असल्याने दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय. त्यामुळे आता महाविकास आघाडीत काही आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळतंय.

आमदार योगेश कदम यांच्या दापोली विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे मला डावलून विविध शासकीय कार्यक्रम घेत असल्याचा आरोप योगेश कदम यांनी केलाय. 12 ऑक्टोबरला झालेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण न देता सुनील तटकरेंनी दापोली येथील पंचायत समिती सभागृहात शासकीय अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली. रायगड-रत्नागिरी जिल्हे जोडणारा आंबेत पूल कमकुवत झाल्यामुळे या पुलावरून जड वाहने नेण्यास मनाई करण्यात आल्याने या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी आपण प्रयत्न केले, तर राज्यमंत्री अदिती तटकरे यांनीही संबंधित अधिकार्‍यांच्या या पुलासंदर्भात बैठका घेतल्या होत्या.

आंबेत पुलावरून जड वाहने नेण्यास परवानगी नसल्याने ही वाहने महाडमार्गे न्यावी लागत असल्याने वेळ व आर्थिक भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागतो. त्यामुळे म्हाप्रळ ते आंबेतदरम्यान फेरी बोट सेवा सुरू करण्यात येणार असून, या दोन्ही बाजूला फेरीबोट लावण्यासाठी जेटीचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून निधीही मंजूर झाला आहे. या कामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्याअगोदरच खासदार सुनील तटकरे यांनी 11 ऑक्टोबरला त्यांचे चिरंजीव आमदार अनिकेत तटकरे व माजी आमदार संजय कदम यांना घेऊन या कामाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाचे मला निमंत्रणही देण्यात आले नाही. तसेच या भूमिपूजनाच्या पाटीवर आपले नाव न टाकता खासदार महोदयांनी राष्ट्रवादी पक्षाचाच भूमिपूजन कार्यक्रम केल्याचा आरोप योगेश कदम यांनी केलाय.

ही बाब अतिशय गंभीर असून, माझ्या हक्कावर गदा आणण्याचे काम सातत्याने खासदार सुनील तटकरे करीत आहेत. त्यामुळे नाइलाजाने आपण 20 ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला असल्याची माहिती योगेश कदम यांनी दिलीय. सुनील तटकरे यांच्यावर पुढील योग्य कारवाई करण्याची विनंती पत्राद्वारे कदम यांनी केलीय. या सर्व प्रकारामुळे आता महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची शक्यता आहे. आता दोन्ही पक्षाचे नेते या संदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागे

'तुम मुझे व्होट दो,हम तुम्हे व्हॅक्सीन देगें' हा भाजपचा नारा;देशात फूट पाडण्याचा प्रयत्न- संजय राऊत
'तुम मुझे व्होट दो,हम तुम्हे व्हॅक्सीन देगें' हा भाजपचा नारा;देशात फूट पाडण्याचा प्रयत्न- संजय राऊत

कोरोनाची लस केवळ भाजपशासित राज्यांमधील नागरिकांनाच मोफत मिळणार का, असा सवा....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनेचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात, 50 जणांच्या उपस्थितीत सोहळा
शिवसेनेचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात, 50 जणांच्या उपस्थितीत सोहळा

कोरोनामुळे शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सा....

Read more