ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बेळगावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला, पाच पुतळे उभारणार

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2020 11:26 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बेळगावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला, पाच पुतळे उभारणार

शहर : देश

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला आहे. आता मनगुत्ती गावात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही तर एकाच ठिकाणी पाच महापुरुषांचे पुतळे उभारले जाणार आहेत. मनगुत्ती गाव प्रमुख शरद पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, बेळगाव सीमाभागासह संपूर्ण कर्नाटकचे आणि महाराष्ट्राचे लक्ष मनगुत्ती गावाकडे लागले होते. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मनगुत्ती आणि अन्य तीन गावच्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला.

सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

हे प्रकरण समोर येताच बेळगाव ते महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक ठिकाणी कर्नाटक सरकारविरोधात आंदोलनं करण्यात आली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवभक्त आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर, मनगुत्ती गावातही याचे पडसाद उमटले. हे सर्व पाहता कर्नाटक सरकारने सावध भूमिका घेत आठ दिवसत शिवरायांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर आता मनगुत्ती गावात फक्त शिवाजी महाराजच नाही, तर पाच महापुरुषांचे पुतळे स्थापन होणार आहेत. मनगुत्ती गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत समाधान व्यक्त होत आहे.

मागे

आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच प्राथमिकता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच प्राथमिकता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांम....

अधिक वाचा

पुढे  

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक, मुलगी शर्मिष्ठाने केल भावनिक ट्विट
प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक, मुलगी शर्मिष्ठाने केल भावनिक ट्विट

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, कन्या श....

Read more