By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2019 04:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
माजी पंतप्रधान आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार डॉ. मनमोहन सिंग यांना असलेली स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्यात आली असून त्यांना आता झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. म्हणजेच त्यांना सीआरपीएफच सुरक्षा कवच असेल.
एसपीजीसुरक्षा ही देशातील महत्वाचा निवडक व्यक्तीचा दिली जाते. देशाच्या सर्वात महत्वाच्या राजकारण्याची सुरक्षा करणारे हे पथक आहे. 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच हत्या केल्यानंतर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ची 1985 मध्ये केवळ पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी स्थापना करण्यात आली. मात्र 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजी कायद्यात बदल करण्यात आला. या बादलानुसार माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबालाही 10 वर्षे सुरक्षा पुरविण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र 2003 मध्ये वाजपेयी सरकारने कायद्यात पुन्हा बादल करून एसपीजीसुरक्षेचा कालावधी 10 वर्षावरुन 1 वर्ष करण्यात आला किंवा सरकारने ठरविल्यानुसार धोक्याची शक्यता किती कमी जास्त आहे, त्यादृष्टीने एसपीजी सुरक्षा देण्याचं धोरण निश्चित करण्यात आल. एसपीजी मध्ये 36 हजाराहून अधिक कर्मचारी असतात.
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या चौघांनाच स्पेशल प्रोटेकशन ग्रुपचे सुरक्षा कवच आहे. सध्याच्या सुरक्षेचा आढावा ही निर्धारित काळात होणारी प्रक्रिया आहे. गुप्तचर यंत्रणांनी घेतलेला आढावा आणि धोक्याची शक्यता लक्षात घेवून निर्णय घेतला जातो. त्यानुसार डॉ. मनमोहन सिंग यांना असलेले एसपीजी सुरक्षा कवच कदुहण घेण्यात आले आहे, असे गृह मंत्रालयाने नमूद केले आहे.
दोन दशकांपूर्वी माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा आणि व्ही.पी. सिंग यांचीही एसपीजी सुरक्षा काढून घेतली गेली होती. माजी पंतप्रधान अटळ बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या निधनापर्यंत म्हणजेच नोव्हेबर 2018 पर्यंत एसपीजी सुरक्षा कायम होती.
माजी केंद्रीय अर्थ, माहिती व प्रसारण व वाणिज्य मंत्री अरुण जेटली यांच्य....
अधिक वाचा