By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 23, 2024 12:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मार्च 1995 मध्ये शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आल्यावर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचे पहिले नेते म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला होता. 1995 ते 1999 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे 3 वाजता निधन झाले. मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 86 वर्षांचे मनोहर जोशी महिले गैरकाँग्रेसी मुख्यमंत्री होते. मातोश्री वृद्धाश्रम, सैनिक स्कूलची सुरुवात त्यांनी केली. शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनवले. १९९५ मध्ये महाराष्ट्राचे ते पहिले गैरकाँग्रेसी मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे ते पहिले शिवसेना नेते आहेत. 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ते शिवसेनेशी संबंधित आहेत.
1967 मध्ये राजकारणात
मनोहर जोशी यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नांदवी गावात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी कायद्याची पदवी घेतली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) ते अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांनी युवकांसाठी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट (KTI) स्थापन केली. त्यांनी 1967 मध्ये राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून ते शिवसेनेच्या निष्ठावंतांपैकी ते एक आहेत. त्यांच्या बंडखोरीच्या अफवा अनेक प्रसंगी उठल्या असल्या तरी त्यांनी शिवसेना सोडली नाही.
मातोश्री वृद्धाश्रम अन् सैनिक स्कूलची सुरुवात
मार्च 1995 मध्ये शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आल्यावर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचे पहिले नेते म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला होता. 1995 ते 1999 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. या काळात त्यांनी महिलांसाठी वृद्धांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना आणि तरुणांसाठी सैनिक शाळा सुरू केली.
असे बनले लोकसभा अध्यक्ष
मनोहर जोशी 2002 ते 2004 या काळात लोकसभेचे अध्यक्ष होते. तत्कालीन लोकसभा अध्यक्ष जी एम सी बालयोगी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यानंतर हे पद रिक्त होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून मनोहर जोशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठे नेते मनोहर जोशी यांचे ....
अधिक वाचा