ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा… जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2024 11:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा… जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

शहर : मुंबई

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नगर येथील ओबीसी एल्गार परिषदेत भुजबळ यांनीच हा गौप्यस्फोट केला आहे. भुजबळ यांच्या या गौप्यस्फोटामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ प्रचंड आक्रमक असल्याचं उघड झालं आहे. तर भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज मोठा गौप्यस्फोट केलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ यांनी 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नगर येथील ओबीसी एल्गार परिषदेत स्वत: छगन भुजबळ यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. भुजबळ यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच भुजबळ यांच्या राजीनाम्यावर अनेक तर्कवितर्कही व्यक्त केले जात आहे. राजकीय वर्तुळातूनही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनीही छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राजीनामा स्वीकारला नाही

छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला होता. पण आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अधिक बोलतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

राजीनाम्याची प्रत आलीच नाही

आमदार संजय गायकवाड यांनीही छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छगन भुजबळ साहेबांनी राजीनामा दिला की नाही मला माहीत नाही. त्या राजीनाम्याची प्रत सुद्धा बाहेर आली नाही, असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला आहे.

भुजबळांशी चर्चा झाली नाही

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजीनामा दिला की नाही याबाबत छगन भुजबळ यांच्याशी माझे बोलणे झालेले नाही. भुजबळ काय बोलले, त्यांच्या काय भावना आहेत या निश्चितपणे आम्ही जाणून घेऊ आणि मगच त्यावर प्रतिक्रिया देऊ. अहमदनगरचे भाषण मी ऐकले नाही. मी त्यांच्याशी जरूर बोलेल. समजून घेईल आणि त्या बाबतीमध्ये आपली प्रतिक्रिया देईल, असं सुनील तटकरे म्हणाले. भुजबळ कधीही पक्ष सोडणार नाहीत. भुजबळ आज जे काही बोलले त्याबाबत मी आज रात्री किंवा उद्या सकाळी त्यांच्याशी बोलेल आणि प्रतिक्रिया देईन, असंही तटकरे यांनी सांगितलं.

ही भुजबळांची चपराक

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ यांनी 17 नोव्हेंबरला झालेल्या ओबीसी मेळाव्याच्या पूर्वीच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भुजबळ यांना राजीनामा मागणाऱ्यांना ही चपराक आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

दुसरा विदूषक बाहेर निघाला

मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दुसरा विदुषक बाहेर निघाला. ते म्हणजेओबीसी बांधव आणि सरकारला सुद्धा कलंक आहेत, असं सांगतानाच आमची विजयी सभा मोजायला ये, असं आव्हानच मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

मागे

16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला, छगन भुजबळ यांचं सर्वात मोठं वक्तव्य; गौप्यस्फोटाने खळबळ
16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला, छगन भुजबळ यांचं सर्वात मोठं वक्तव्य; गौप्यस्फोटाने खळबळ

ओबीसी नेते देखील घाबरतात. मात्र आमच्या सोबत 70 टक्के समाज आहे. बजेटमधून आम्हा....

अधिक वाचा

पुढे  

‘शरद पवारांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा, तुम्हाला पाषाणही म्हणता येणार नाही’, आव्हाड संतापले
‘शरद पवारांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा, तुम्हाला पाषाणही म्हणता येणार नाही’, आव्हाड संतापले

"ज्या माणसाने तुम्हाला राजकारणात आणलं, ज्यांनी तुम्हाला मांडीवर बसवलं त्....

Read more