By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: एप्रिल 03, 2019 05:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सातत्याने शिवसेनेवर टीका करणारे आणि थेट 'मातोश्री' ला टार्गेट करणारे खासदार किरीट सोमय्या यांचे भाजपने तिकीट कापले आहे. भाजपने आज लोकसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची आणखी एक यादी प्रसिद्ध केली. या यादीत उत्तर पूर्व मुंबईतून मनोज कोटक यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
मनोज कोटक यांची ईशान्य मुंबईत चांगली कामगिरी आहे. याचा विचार करुन त्यांना ही संधी देण्यात आल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोटक यांच्या कामकाजावर त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. किरीट सोमय्या यांचा पत्ता कापण्यासाठी शिवसेनेने भाजपवर मोठे दबावतंत्र वापरले होते. त्यात शिवसेनेला यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. क....
अधिक वाचा