By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 04:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली आहे. राष्ट्रवादीतून बंड करून भाजपला पाठिंबा दिलेल्या अजित पवार यांनी माघार घेतल्याने भाजपची मोठी गोची झाली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कूटनीतीवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. कारण महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेसाठी दिल्लीतूनही हालचाली झाल्याची चर्चा होती.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची 'चाणक्य' अशी प्रतिमा निर्माण करण्यात येते. देशातील अनेक राज्यांत त्यांनी स्पष्ट बहुमत नसतानाही भाजपचं सरकार स्थापन केलं होतं. मात्र महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असतानाही त्यांचं सरकार कोसळलं आहे. पण भाजपच्या या चाणक्याला याआधीही अपयश पाहायला मिळालं आहे. महाराष्ट्रासह देशातील सात राज्यांमध्ये अमित शहा हे सत्तास्थापनेचं आपलं कौशल्य दाखवू शकले नाहीत.
मागील वर्षी देशातील पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निडवणुकांत भाजपचा मोठा पराभव झाला. भाजपचा पराभव झालेल्या पाचपैकी तीन राज्यांत तर याआधी त्यांचीच सत्ता होती. अशा राज्यांतही भाजपचा दारुण पराभव झाला. पण अमित शहा अध्यक्ष झाल्यानंतर भाजपची पहिल्यांदाच धूळधाण झालेली नाही.अमित शहा यांचं नेतृत्व असताना याआधीही भाजपने काही राज्यं गमावलेली आहेत. भाजपच्या या चाणक्यच्या हातून निसटलेल्या 7 राज्यांविषयी जाणून घेऊयात.
दिल्ली- 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत AAP ने 70 पैकी 67 जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला.
बिहार- पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी एकत्र येत अमित शहांचे सगळे डावपेच फेल केले. बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने भाजपचा दारुण पराभव केला.
पंजाब- पंजाबमध्ये भाजप हा अकाली दलासोबत सत्तेत होता. त्या सरकारविरोधात असलेला लोकांचा रोष अमित शहा काही कमी करू शकले नाहीत. पंजाबमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केला.
राजस्थान- राजस्थान विधानसभा निवडणुकीला भाजप सत्ताधारी पक्ष म्हणूनच सामोरा गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सभा घेत भाजपसाठी जोर लावला. पण बाजी काँग्रेसने मारली. शहांची चाणक्यनीती इथंही प्रभाव पाडू शकली नाही.
छत्तीसगड- 15 वर्ष सत्ता असणारं हे राज्य भाजपच्या हातून निसटलं. काँग्रेसने या राज्यात एक तृतीयांश बहुमत मिळवलं आहे.
मध्य प्रदेश- भाजपचा गड म्हणून ओळखला जाणाऱ्या मध्य प्रदेशलाही काँग्रेसने भगदाड पाडलं. काँग्रेस मध्य प्रदेशमधील क्रमांक 1 चा पक्ष ठरला होता.
अमित शहा म्हणजे निवडणुका जिंकण्याचं अस्त्र आहे, असं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र या 7 राज्यांनी मात्र चाणक्यनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी उलथापालथ झाली. दोन दिवसांच्या रा....
अधिक वाचा