ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठा आंदोलनाचा मोठा विजय, सर्व मागण्या मान्य, पहाटे अध्यादेश निघाला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 27, 2024 07:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा आंदोलनाचा मोठा विजय, सर्व मागण्या मान्य, पहाटे अध्यादेश निघाला

शहर : मुंबई

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. त्यानंतर आता वाशीमध्ये विजयी सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. यामुळे शनिवारी दि 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित विजयी सभा होणार आहे.

सर्व मागण्या मान्य, अध्यादेश मिळाला

मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबाना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सगा सोयराबद्दल अध्यादेश काढले आहे. तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

गुन्हे मागे घेतले जाणार

राज्यातील मराठी बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणचे काम केले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्याशी विरोध संपला

समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. उद्या सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत. मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावले आहे. उद्या आम्ही येथे सभा घेणार आहे मुंबईत जाणार नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेले मराठा आंदोलन आता संपल्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

मागे

  'मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी कोर्टानं फेटाळली
'मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी कोर्टानं फेटाळली

गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई हा....

अधिक वाचा

पुढे  

या विजयाचे श्रेय माझ्या मराठा बांधवांचे, अडचण आल्यास लढत राहील -मनोज जरांगे
या विजयाचे श्रेय माझ्या मराठा बांधवांचे, अडचण आल्यास लढत राहील -मनोज जरांगे

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणारे, मराठा आंदोलक मनोज जरांगे ....

Read more