By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 25, 2024 12:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत दाखल होणार आहे. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे- मुंबई महामार्गावरील मार्ग बदलण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते पुणे शहराकडून मुंबई शहराकडे निघाले आहेत. पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता लोणावळ्यात मनोज जरांगे पाटील दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्च्याला ठरलेल्या कार्यक्रमानुसार १२ ते १४ तास उशीर झाला आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करत असताना नवीन मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. एक्स्प्रेस महामार्गावर सीआरपीएफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे. मराठा आंदोलक एक्स्प्रेस हायवेवर चढू नये बंदोबस्त लावला आहे. मनोज जरांगे यांचा आज वाशीमध्ये मुक्काम असणार आहे.
मुंबईकडे येतानाचा मार्ग बदलला
मनोज जरांगे यांचा लोणावळ्यातून पनवेलकडे येतानाचा मार्ग पोलिसांनी बदलला आहे. आंदोलकांना पुणे मुंबई मार्गावर जुन्या घाटातून जाण्याच्या पोलिसांनी सूचना केल्या आहेत. परंतु आंदोलक नवीन मार्गावरुन जाण्याचा भूमिकेवर ठाम आहे.
आझाद मैदानासंदर्भात नोटीस
आझादा मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. आझाद मैदानाची क्षमता पाच हजार आहे. परंतु लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे आझाद मैदानाच्या क्षमतेची मनोज जरांगे यांना जाणीव करुन द्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.
मुंबईतील एपीएमसीतील सर्व मार्केट कडकडीत बंद
मनोज जरांगे पाटील यांचे भगवे वादळ मराठा आरक्षणासाठी मुंबईत येत आहे. ते आज नवी मुंबईत धडकणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसीतील सर्व मार्केटमध्ये कडकडीत बंद करण्यात आला आहे. वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये त्यांची रात्री राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच ही बाजारात जवळपास चार ते पाच लाख लोकांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केल्याने सर्व बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले.
मुंबईत पोलिसांचा फौजफाटा
मनोज जरांगे पाटलांचा लाखोंचा जनसमुदाय हा नवी मुंबई शहरांमध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी नवी मुंबई आणि मुंबईचे पोलीस सज्ज झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह अडीच ते तीन हजाराचा फौज फाटा हा मैदानात उतरला आहे. मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या घटना घडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे.
नाशिक शहरात १५ दिवस मनाई आदेश लागू
नाशिकमध्ये विनापरवानगी मोर्चा, आंदोलन, निदर्शने करण्यास ८ फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलन, राजकीय पक्षांच्या आमदार फूट प्रकरणी न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या ....
अधिक वाचा