By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 03:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
मराठी माणसांच्या हितासाठी, मराठी माणसांच्या भल्यासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. हे ध्येय घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेला मात्र विसर पडलेलाच दिसून येत आहे. आता शिवसेना मराठी भाषिकांना डावलून इतर भाषिकांना जवळ करत असल्याचे चित्र सध्या ठाणे लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भारतीय जनता पक्ष-आरपीआय(ए) युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या निवडणूक प्रचारासाठी आता शिवसेनेने इतर भाषिकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मराठी माणूस मुंबईतून जवळजवळ हद्दपार होतच आहे. आता या मराठी माणसाला ठाण्यातूनही हद्दपार करण्याचे ठरवले आहे काय, असा सवाल आज ठाणेकर नागरिकांकडून विचारला जात आहे.२५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भारतीय जनता पक्ष-आरपीआय(ए) युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या निवडणूक प्रचारासाठी मीरा-भाईंदर शहरातील गुजराती, राजस्थानी, बंगाली, दक्षिण भारतीय समाजाच्या बैठका घेण्यात येत आहेत. मीरा रोड-भाईंदरमध्ये या सभा घेण्यात येत आहेत. उमेदवार विचारे यांच्या निवडणूक प्रचाराच्या रॅलीसाठी आता शिवसेनेला इतर भाषीय अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहेत.यामुळे मराठी माणसांच्या जीवावर उभारलेल्या शिवसेनेला आता मराठी माणसांच्या हिताचाच विसर पडलेला दिसून येत आहे. हे ध्येय घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेने मराठी भाषिकांना झुलवत ठेवण्याचेच काम केले असल्याचे आता मुंबईकर मराठी माणूस उघड-उघड बोलू लागला आहे. मुंबईतून तर मराठी माणूस जवळजवळ हद्दपारच होत आहे.मात्र, ठाण्यात असलेला मराठी टक्काही आता शिवसेना आपल्या कर्तृत्वाने घसरवू पाहत आहे, हे ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप पक्ष-आरपीआय(ए) युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या निवडणूक प्रचारातून दिसून येत असल्याने ठाणेकर मराठी भाषिकही धास्तावला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान गुरूवारी पाड पडत आहे. सकाळी ७ व....
अधिक वाचा