ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाकने भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी मसुदला गुपचुप सोडले

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 09, 2019 06:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पाकने भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी मसुदला गुपचुप सोडले

शहर : delhi

जम्मू कश्मीर मधून 370 कलम भारताने हटविल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून समर्थन मिळवून भारताला हा निर्णय मागे घेण्यास लावण्याचा पाकचा दावाही फसला आहे. मुस्लिम राष्ट्रांनीही याबाबतीत पाकला समर्थन द्देण्यास नकार दिला. त्यामुळे एकाकी पडलेल्या पाकने आता भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या नापाक इराद्याने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरसह अन्य एका मोस्ट वॉन्टेड अतिरेक्याची तुरुंगातून गुपचुप सुटका केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला दिली आहे.

भारतावर दबाव आणण्याचे सर्व प्रयत्न असफल झाल्यामुळे पाकने भारतात दहशतवादी हल्ले करण्याचे कट कारस्थान रचले आहे. याच कटाचा एक भाग म्हणून राजस्थान सीमेजवळ अतिरिक्त पाक सैन्य तैनात करण्यात येत आहे. त्याचबरोबर दहशतवादी घुसविण्याचे प्रयत्न ही करण्यात येत आहे. शिवाय शस्त्रसंधीचे उलंघण वारंवार करून भारताला डीवचण्याचे प्रकारही पाक करीत आहे. तरीही भारतावर त्याचा काहीही परिणाम होत नसल्याने पाक अधिकच अस्वस्थ आहे. अशा स्थितीत भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकने जैशचा म्होरक्या मसूदला सोडल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या जवानांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांचे एकाच वेळी होणार भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांचे एकाच वेळी होणार भाषण

संयुक्त राष्ट्र संघाची महासभा न्यूयॉर्कमध्ये 24 ते 30 सप्टेंबर या काळात 74 वी म....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्राचा एकात्मिक जल आराखडा तयार - गिरीष महाजन
महाराष्ट्राचा एकात्मिक जल आराखडा तयार - गिरीष महाजन

राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी म्हणून सर्व नदी खोऱ्यांचे ....

Read more