ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मायावती यूपीतल्या गुंड, निवडणुकीनंतर तुरुंगात जातील - बृजभूषण शरण सिंह

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 04, 2019 02:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मायावती यूपीतल्या गुंड, निवडणुकीनंतर तुरुंगात जातील - बृजभूषण शरण सिंह

शहर : देश

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, राजकीय नेतेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. यादरम्यान केसरगंजचे भाजपा खासदार आणि उमेदवार बृजभूषण शरण सिंह यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांना उत्तर प्रदेशातली सर्वात मोठी गुंड असल्याचं म्हटलं आहे. निवडणुकीनंतर मायावती तुरुंगाची हवा खातील, असंही ते म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मायावतींनी केसरगंजमध्ये महागठबंधनचे बसपाचे उमेदवार चंद्रदेव राम यादव यांच्यासाठी निवडणूक सभा घेतली होती. त्या सभेत मायावतींनी बृजभूषण यांच्यावर टीका केली होती.तसेच बृजभूषण माफिया आणि गुंडा असल्याचं मायावती म्हणाल्या होत्या. त्यावर बृजभूषण यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, मायावतींनी गोंडामधल्या एक रॅलीदरम्यान मला गुंडा म्हटलं आहे. मला असं वाटतं की त्या स्वतःच गुंड आहेत. त्यांनी मला निवडणुकीनंतर जेलमध्ये घालण्याची धमकी दिली आहे. परंतु निवडणुकीनंतर त्या स्वतःच जेलमध्ये जातील, असंही बृजभूषण म्हणाले आहेत.

खरं तर मायावतींनी बसपा उमेदवार चंद्रदेव राम यादव यांच्यासाठी निवडणूक रॅलीला संबोधित केलं होतं. या दरम्यान भाजपाचे उमेदवार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर टीका करताना योगी सरकार आणि मोदी सरकारवही हल्लाबोल केला आहे. नमो नमोचा खेळ आता संपला आहे. त्यामुळे निवडणुकीत मोदींचं नाटक चालणार नाही, असंही मायावती म्हणाल्या आहेत

 

मागे

भारतीय सेना मोदींची खाजगी संपत्ती नाही,सर्जिकल स्ट्राईक सेनेनं केली होती मोदींनी नाही
भारतीय सेना मोदींची खाजगी संपत्ती नाही,सर्जिकल स्ट्राईक सेनेनं केली होती मोदींनी नाही

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाज....

अधिक वाचा

पुढे  

लोकसभा निवडणुक : मुलांकडून घोषणाबाजी, किरण खेर अडचणीत
लोकसभा निवडणुक : मुलांकडून घोषणाबाजी, किरण खेर अडचणीत

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुलांना घोषणा द्यायला लावल्यामुळे भा....

Read more