By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2020 06:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
कोरोना काळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता. यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपलब्ध होत आहे. याप्रकरणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी “पांडुरंगच्या मृत्यूला व्यवस्थेतील त्रुटी जबाबदार, मी मान्य करतो,” अशी प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.
मुरलीधर मोहोळ नेमकं काय म्हणाले?
“पांडुरंग आपल्यातून जाणं ही निश्चितच आपल्यासाठी धक्कादायक बाब आहे. ही दुर्देवी घटना आहे. गेले पाच महिने ते पुण्यातील कोरोना स्थितीवर त्यांचं बारीक निरीक्षण होते. त्यांनी खूप काम केलं.”
“पांडुरंगच्या सर्व विषयात आम्ही सर्वजण पत्रकारांशी संपर्कात होतो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना बेड उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. रात्री बेड उपलब्ध झाला. मात्र, कार्डिअॅक रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. व्यवस्थेतील या त्रुटी पांडुरंग रायकर यांना आपल्यातून घेऊन गेल्या मी हे मान्य करतो,” असे महापौरांनी सांगितले.
“त्यामुळे कुणीही जबाबदारी झटकायचीच नाही. ही महापालिकेची जबाबदारी आहे, की राज्य सरकारची असं म्हणून कुणीही जबाबदारी झटकायची नाही,” असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.
“रात्री दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बेड उपलब्ध करुन दिला. मात्र इतक्या क्रिटीकल अवस्थेतत त्यांना रुग्णालयातून हलवणं डॉक्टरांनाही धोकादायक वाटले असावे. ते माझे खूप जवळचे मित्र होते. गेले अनेक वर्ष माझे आणि त्यांचे चांगले संबंध होते. व्यवस्थेतील ज्या काही त्रुटी दोष असतील, कोणतीही यंत्रणा असेल, महापालिका रुग्णालय किंवा राज्य शासनाने उभारलेले जम्बो हॉस्पिटल असेल ही जबाबदारी कोणी कोणावर न ढकलता ही स्वीकारली पाहिजे,” असे महापौरांनी सांगितले.
“कमी वयाचा, अत्यंत मनमिळावू माणूस जाणं हे दुख:द आहे. इतकं मोठं जम्बो रुग्णालय उभारताना महापालिकेने 25 टक्के निधी उभं करुन देण्याचं उपलब्ध करुन देण्याचं ठरलं होतं. त्या ठिकाणी इन्फ्रास्टक्चर, मेडिकल साहित्य किंवा इतर सर्व सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी टेंडरच्या माध्यमातून राज्य शासनाने केली. ही जबाबदारी 100 टक्के त्यांनी स्वीकारावी हे मी सांगणार नाही.”
“ज्या काही नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत. यातील सामुहिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पांडुरंगसारखे भविष्यात कोणतीही घटना होणार नाही, याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला मुख्यमं....
अधिक वाचा