ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

संरक्षण मंत्र्यांच्या भेटीन शशी थरुर भावूक

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 02:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

संरक्षण मंत्र्यांच्या भेटीन शशी थरुर भावूक

शहर : thirupuvanam

आज सकाळी रुग्णालयात जाऊन संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी काँग्रेसचे नेते आणि उमेदवार शशी थरुर यांची भेट घेतली. निर्मला सीतारमन यांच्या भेटीने भावूक झालेल्या शशी थरुर यांनी त्यांच्यासोबतचा फोटो आणि एक संदेश ट्विट केला आहे. निवडणुकीत व्यस्त असूनही निर्मला सीतारमन आज मला भेटण्यासाठी रुग्णालयात आल्या होत्या. त्यांच्या भेटीने मन भरुन आले. शिष्टाचार ही भारतीय राजकारणातील दुर्मिळ बाब आहे. खरोखर त्यांच्या भेटीने आनंद झाला असे ट्विट थरुर यांनी केले आहे. सोमवारी केरळ तिरुअनंतपूरममधील मंदिरात ‘तुलाभरम’ हा धार्मिक विधी करत असताना शशी थरुर जखमी झाले.
तराजूचा लोखंडी हूक त्यांच्या डोक्यावर आदळून ते जखमी झाले. ‘तुलाभरम’ विधीच्या वेळी तराजूच्या एका बाजूला ती व्यक्ती बसते तर दुसर्‍या बाजूला तराजूमध्ये त्याच्या वजनाइतकी फळे, मिठाई ठेवली जाते. हा विधी सुरु असताना काल शशी थरुर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला सहा टाके घालण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शशी थरुर सलग तिसर्‍यांदा तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून जिंकण्यास उत्सुक आहेत. 23 एप्रिल रोजी केरळमध्ये मतदान होणार आहे.

मागे

रात्री सव्वादोन वाजता मोदी म्हणाले,“दादा बिटिया गिरनी चाहिए”
रात्री सव्वादोन वाजता मोदी म्हणाले,“दादा बिटिया गिरनी चाहिए”

महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी साताऱ्यातील वाईच्या सभेत,....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात अभिनेत्री नवनीत राणा पुन्हा रिंगणात
शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात अभिनेत्री नवनीत राणा पुन्हा रिंगणात

अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात महाआघा....

Read more