ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची बैठक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 16, 2019 12:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची बैठक

शहर : मुंबई

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी सुरु झाली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. गेली साडे चार वर्षे काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांना आज भाजपाने शपथ देत कॅबिनेट मंत्री केले आहे. या शपथविधीवेळीच विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पावसाळी अधिवेशनासाठी बैठक बोलावली आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा गटनेता आमदार विजय वडेट्टीवार, शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, विधानसभा उपनेता आमदार नसीम खान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, सपाचे नेते आमदार अबु आझमी, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार कपिल पाटील, आमदार भास्करराव जाधव, आमदार हेमंत टकले, आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे, आमदार रामहरी रुपनवार उपस्थित आहेत.

विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

 

मागे

महाराष्ट्राच्या राजकारणात गमतीशीर घडना; विरोधी पक्षनेता थेट कॅबिनेट मंत्री
महाराष्ट्राच्या राजकारणात गमतीशीर घडना; विरोधी पक्षनेता थेट कॅबिनेट मंत्री

महाराष्ट्राच्या राजकारणात एक गमतीशीर घडना घडली आहे. विरोधी पक्षनेता असलेल....

अधिक वाचा

पुढे  

आमचं सरकार भ्रष्ट शासन देणार; उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
आमचं सरकार भ्रष्ट शासन देणार; उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

नुकत्याच आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या पी. पुष्पा ....

Read more