By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 05:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jammu
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सत्ताधारी एनडीएला भरघोस यश मिळाले आहे. आतापर्यंत मतमोजणीच्या आलेल्या आकड्यांनुसार, देशातील निवडणुकांबाबतचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. देशात पुन्हा एकदा मोदी लाट असल्याचे पाहायला मिळत आहे. मतमोजणी अद्याप सुरु असून निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या एकूण 542 जागांपैकी 339 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस 52 जागांवर आघाडीवर आहे. यादरम्यान राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाच्या शुभेच्छा देत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
'मोदींना शुभेच्छा. आजचा दिवस निश्चित भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे. आता काँग्रेसने त्यांच्यासाठी कोणी अमित शाह शोधावा' असं ट्विट मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. मेहबूबा मुफ्ती अनंतनाग मतदारसंघातून निवडणूक लढवत असून तिसऱ्या स्थानी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तीन जागांवर भाजप आणि तीन जागांवर नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहे.दरम्यान, तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या ऐतिहासिक यशाबद्दल ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 'सर्व विजेत्यांचे अभिनंदन परंतु जे अपयशी झाले आहेत ते सर्व अपयशी नाही. संपूर्ण निकाल आल्यानंतरच माझं मत मांडेन' असं त्यांनी ट्विट केले आहे.
लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास दणक्यात सुरुवात होताच सर्व स्तरांत....
अधिक वाचा