By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 27, 2019 05:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बीड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीड मध्ये दाखल होताच शिवसंग्राम चे आमदार विनायक मेटे यांनी बीडच्या प्रवेशव्दारावर यात्रेचे भव्य स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनीही मेटे यांना रथावर घेतले . त्यामुळे आधीच रथात असालेल्या पालक मंत्री पंकजा मुंडे व त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांनी रथातून काढता पाय घेतला. या प्रकाराने पंकजा मुंडे नाराज झाल्याचे दिसले.
विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठी दरी निर्माण झाली आहे. साहजिकच मुखमंत्र्यांनी मेटे यांना रथात घेतल्याने नाराज झालेल्या मुंडे भगिनी रथातून उतरून थेट रेस्ट हाऊसला गेल्या. मग त्यांच्या बरोबर त्यांचे कार्यकर्तेही कार्यक्रम स्थळी न जाता रेस्ट हाऊसला पोचले. साहजिकच मग स्वत: मुख्यमंत्री फडणवीस रेस्ट हाऊसला गेले आणि त्यांनी पंकजा मुंडे यांची समजूत घालून त्यांना सभास्थळी आपल्या सोबत घेवून आल्याचे सांगण्यात येते. यावर सारवासारव करताना विनायक मेटे यांनी सांगितले की, "सभेला उशीर होत असल्यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे निघून गेल्या."
देशाच्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार कोटी रुप....
अधिक वाचा