By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 01:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
औरंगाबाद महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच गोंधळ झाला. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा वरून भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी राजदंड पळवला आणि महापौरांच्या आसनासमोर सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केलं. तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा अभिनंदन करण्याचा प्रस्ताव एमआयएम नगरसेवकानं ठेवला. त्यावरून गोंधळ सुरू झाला.
एमआयएमच्या नगरसेवकांनी राजदंड पळवला. यावरून महापौरांनी एमआयएमच्या ६ नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित केलं. दरम्यान काँग्रेस नगरसेवक अफसर खान यांनी इम्तियाज जलील गुटका किंग असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत केला. जलील पैसे खातात सेटलमेंट करतात, गुंडगिरी करतात त्यामुळं त्यांचं कसलं अभिनंदन असा आरोप अफसर खान यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत तुम्ही मनापासून काम केले नाहीत, अशा शब्दांत प्रियंका गांध....
अधिक वाचा