ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आमदार-खासदार नापास चालेल पण सरपंच मात्र सातवी पास हवा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2020 06:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आमदार-खासदार नापास चालेल पण सरपंच मात्र सातवी पास हवा

शहर : मुंबई

सध्या राज्यात सरपंचपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यात तुम्हाला सरपंच व्हायचं असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. १९९५ सालानंतर तुम्ही जन्मला असाल आणि तुम्हाला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असेल तर तुम्ही सातवी पास असणं गरजेचं आहे...... काय आहे हा अजब फतवा....

मिशांना पीळ देत सरपंच होण्याची स्वप्न पाहात असाल. तर आधी सातवी पास झालायत का, आणि तसं सर्टिफिकीट आहे का? त्याचा विचार करा. कारण सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सातवी उत्तीर्णच हवा, असा अजब फतवा राज्य निवडणूक आयोगानं काढला आहे.

ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवायची असेल तर सातवी पास असणं आवश्यक आहे.... गेल्या सरकारने सरपंचाची निवड थेट निवडणुकीद्वारे करण्याचा कायदा केला होता. आता मात्र निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंच निवडण्यात येणार आहे.

अख्ख्या देशाचा कारभार सांभाळणाऱ्या खासदारांना शिक्षणाची कुठलीही अट का नाही. राज्याचा गाडा चालवणाऱ्या आमदारांनाही शिक्षणाची अट का नाही. मग गावगाडा सांभाळणाऱ्या सरपंचालाच शिक्षणाची अट कशासाठी ? खासदार, आमदार निरक्षर चालतील, सरपंचालाच शिक्षणाचा अट्टाहास कशासाठी ?

या प्रश्नांचा विचार न करताच राज्य निवडणूक आयोगानं निर्णय घेतला का? एवढी महत्त्वाची जबाबदारी असलेल्या मंत्री, आमदार, खासदारांना कुणी शिक्षण विचारणार नाही पण गावापुरत्या सरपंचाला सातवी पासची अट घालून असा काय तीर मारला आहे.

मागे

Karnataka Gram Panchyat Election Result:कर्नाटकातील 72 हजार ग्रामपंचायतींचा निकाल; भाजपची मोठी आघाडी
Karnataka Gram Panchyat Election Result:कर्नाटकातील 72 हजार ग्रामपंचायतींचा निकाल; भाजपची मोठी आघाडी

कर्नाटक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल (Karnataka Gram Panchyat Election Result) बुधवारी जाहीर होणार ....

अधिक वाचा

पुढे  

वर्ष नवे, हर्ष नवा, अजित पवार-देवेंद्र फडणवीस पुण्यात एकाच मंचावर
वर्ष नवे, हर्ष नवा, अजित पवार-देवेंद्र फडणवीस पुण्यात एकाच मंचावर

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) न....

Read more