ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...तर यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील, नितेश राणेंची टीका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 28, 2020 10:26 AM 2019-02-12T14:15:30+5:30

...तर यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील, नितेश राणेंची टीका

शहर : मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपयांचा खर्च केला आहे. माहिती अधिकार कायद्यातंर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवर टीका केली आहे.

पेंग्विन आणि कंगना रनौतच्या प्रकरणातील वकीलासाठी मुंबईकर कर भरतात. आणखी काय शिल्लक आहे? आता असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील,” असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत ही टीका केली आहे.

नेमकं प्रकरणं काय?

अभिनेत्री कंगना रानौतने वांद्रे पाली हिल येथील आपल्या घरात माणिकर्णिका फिल्म्सचे कार्यालय सुरु केले होते. या कार्यालयात कंगनाने बेकायदेशीर बांधकाम केले होते. याच दरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्याचे मुंबईत याचे पडसाद उमटले होते. मुंबई महापालिकेने कंगनाला बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी 354 कलमान्वये नोटीस दिली होती. या नोटीसीला योग्य उत्तर दिले नसल्याने पालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले होते.

कंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले जात असताना कंगणाच्या वकिलाने आपण उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचे निदर्शनास आणल्यावर तोडकाम थांबण्यात आले होते. कंगणाच्या बेकायदेशीर काम तोडण्यास उच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेने कोणत्या वकिलाची नियुक्ती केली आणि त्यांना किती रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी मागितली होती.

याबाबत माहिती देताना या प्रकरणी पालिकेची उच्च न्यायालयात मांडण्यासाठी अस्पि चिनॉय यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना पालिकेने 22 सप्टेंबर रोजी 3 वेळा 7 लाख 50 हजार तर 7 ऑक्टोबर 8 वेळा 7 लाख 50 हजार रुपये असे एकूण 82 लाख 50 हजार रुपये फी म्हणून अदा केले आहेत अशी माहिती पालिकेच्या कायदा विभागाने दिली आहे.

मागे

Bihar elections 2020 | पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी आज मतदान; आठ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Bihar elections 2020 | पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी आज मतदान; आठ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी म्हणजेच एकूण 71 जागा....

अधिक वाचा

पुढे  

'त्या' महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले
'त्या' महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) कामातील दिरंगाईबद्दल केंद्री....

Read more