ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज ठाकरे राजू शेट्टींसाठी कोल्हापूरच्या मैदानात उतरणार

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 12:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज ठाकरे राजू शेट्टींसाठी कोल्हापूरच्या मैदानात उतरणार

शहर : कोल्हापूर

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 9 ते 10 उमेदवारांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचारसभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्यासाठीही राज ठाकरे कोल्हापूरच्या मैदानात उतरणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाआघाडीतील घटकपक्ष आहे. येत्या 18 किंवा 19 एप्रिल रोजी राज ठाकरे राजू शेट्टींच्या जागेसाठी कोल्हापुरात सभा घेणार आहेत. या सभेच्या निमित्ताने राज ठाकरे आणि राजू शेट्टी पहिल्यांदाच जाहीर व्यासपीठावर एकत्र दिसतील. 

उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह 9 उमेदवारांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचाराच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

सोलापूर – सुशील कुमार शिंदे (काँग्रेस)
नांदेड – अशोक चव्हाण (काँग्रेस)
सातारा – उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
मावळ – पार्थ पवार (राष्ट्रवादी)
बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
उत्तर मुंबई – उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)
ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील (राष्ट्रवादी)
नाशिक – समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी)

Recommended Articles

मागे

आप महाराष्ट्रातून लोकसभेची निवडणूक लढवणार नाही
आप महाराष्ट्रातून लोकसभेची निवडणूक लढवणार नाही

महाराष्ट्रातून ‘आप’ लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, असे या पक्षाचे प्रद�....

अधिक वाचा

पुढे  

इतर कोणत्याही पक्षाकडून मला उमेदवारी दिल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे - सुरेखा पुणेकर
इतर कोणत्याही पक्षाकडून मला उमेदवारी दिल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे - सुरेखा पुणेकर

“मी लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयार आहे, मात्र कुणी उमेदवारीच देत नाही” अ....

Read more