By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 11:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभा निवडणुका लढणार नाही. मात्र आपण पंतप्रधान मोदी आणि भाजपाविरुद्ध प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे राज यांनी मागील आठवड्याभरापासून महाराष्ट्रातील काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत. तर, १२ एप्रिल रोजी नांदेडमध्ये, १५ एप्रिल रोजी सोलापूर तर मंगळवारी कोल्हापूरमधील इचलकरंजी येथे राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. नांदेड येथील सभेपासूनच राज्यभरात राज यांच्या दौऱ्याची चांगलीच चर्चा चांगलीच रंगलीय. पहिल्याच सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींची काही वर्षांपूर्वीची आणि आत्ताच्या विधानांचे व्हिडिओ दाखवून त्यांनी दिलेली आश्वासने किती फसवी आहेत यासंदर्भात भाषण केले होते. पुराव्यांसकट राज यांनी केलेले हे स्मार्ट भाषण नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीस पडले. त्यानंतरच्या दोन्ही सभांमध्येही त्यांनी व्हिडिओचा वापर करुन सरकारवर घणाघाती टिकास्त्र सोडले. याच व्हिडिओचा धसका आता विरोधकांनी घेतल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. सभांमध्ये हे व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवायला सांगताना राज ठाकरे कार्यकर्त्यांना लाव रे तो व्हिडिओ म्हणताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी आता याच लाव रे तो व्हिडिओ बद्दल सोशल नेटवर्किंगवर अनेक पोस्ट केल्या आहेत. अनेकांनी राज यांच्या प्रचाराची ही स्टाइल आवडल्याचे म्हटले आहे. तर काहींनी या व्हिडिओचा आता विरोधकांनी धसका घेतल्याचे मत मांड़ले आहे. ट्विटर तसेच फेसबुकवर लाव रे तो व्हिडिओ नावाने अनेक पोस्ट करण्यात आल्या असून हे चार शब्द सध्या नेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अधक्ष राज ठाकरे भाजपच्या विरोधात प्रचार करत ....
अधिक वाचा