ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एक आणि एक अकरा की चौकीदारांचा बकरा? मनसेच आशिष शेलारांना चोख प्रत्युत्तर

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 05:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एक आणि एक अकरा की चौकीदारांचा बकरा? मनसेच आशिष शेलारांना चोख प्रत्युत्तर

शहर : मुंबई

मुंबई- निवडणुका जवळ येऊ लागल्यानं राजकीय पक्षांची प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. काँग्रेस आघाडी आणि भाजपा युतीचे नेते एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मनसेनं लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका जाहीर केली असली तरी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास सांगितलं आहे. त्यातच आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसेमध्ये ट्विटरवर वॉर रंगले आहे.

दोन दिवसांपूर्वी दादरमधील शिवाजी पार्क परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड संवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी एकनाथ गायकवाड यांचा प्रचार सुरू असताना त्यांच्यासोबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे मनसैनिकांसह सहभागी झाले. यावरुन आशीष शेलार यांनी शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला असे सांगत मनसेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटवरुन पुन्हा मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.  आशिष शेलार यांनी मनसेला डिवचण्यासाठी केलेल्या ट्विटला मनसेनंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

मागे

२०१२ साली ११.७९ कोटींचे मालक असलेल्या शहांची आत्ताची  संपत्ती तीन पटींनी वाढली ...
२०१२ साली ११.७९ कोटींचे मालक असलेल्या शहांची आत्ताची संपत्ती तीन पटींनी वाढली ...

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती गेल्या सात वर्षात तीन पटी....

अधिक वाचा

पुढे  

मी चौकीदार नसून जन्मत:च शिवसैनिक   : उद्धव ठाकरे
मी चौकीदार नसून जन्मत:च शिवसैनिक : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या 'मै भी चौकी....

Read more